Karun Nair Injury Update: भारत-इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या (20 जून) हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी करुण नायरचे (Karun Nair) नाव भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. मधल्या फळीतील या फलंदाजाची बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन होत आहे. आणि या पुनरागमनापूर्वी त्याच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बुधवारी (18 जून) सरावादरम्यान त्याला चेंडू लागला. नायर नेट्समध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) सामना करत होता आणि चेंडू त्याच्या पोटाच्या खालच्या भागाला लागला. (Karun Nair Injury Update)
कृष्णा लगेच नायरची विचारपूस करण्यासाठी पोहोचला. मात्र, त्याक्षणी करुण नायर वेदनेत होता. त्यानंतरही त्याने वेदना विसरून हसत हसत प्रतिसाद दिला. चेंडू नेमका कुठे लागला हे त्याने कृष्णाला सांगितले.
लीड्समध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या मालिकेने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) मध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. सलग दोनदा फायनलमध्ये पोहोचल्यानंतर, भारतीय संघ 2023-25च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात पोहोचू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025ची ट्रॉफी उंचावली.
नायरने आपला शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये खेळला होता. आणि आता 8 वर्षांनंतर तो भारतासाठी कसोटी खेळताना दिसू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने या फॉरमॅटमध्ये खूप धावा केल्या आणि याच कारणामुळे निवडकर्त्यांनी त्याला या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात समाविष्ट केले आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (Karun Nair Test Comeback)
करूण नायरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2016 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याचे पहिले 2 कसोटी सामने अप्रतिम होते. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक (Triple Century) झळकावणारा तो भारताकडून दुसराच फलंदाज ठरला. यापूर्वी फक्त वीरेंद्र सेहवागनेच (Virender Sehwag) असे केले होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेत त्याला संघर्ष करावा लागला आणि यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.
The incident where Karun Nair got hit at the nets by a delivery from @prasidh43 @RohanDC98 #ENGvsIND #Headingley pic.twitter.com/xGMsiSF8PA
— RevSportz Global (@RevSportzGlobal) June 18, 2025