भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आतापर्यंत सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो.अनेक दिग्गज खेळाडूंच्या म्हणण्यानुसार त्याच्या इतका तंदुरूस्त दुसरा खेळाडू भारतीय संघात कधीही नव्हता.
विराटने खुप कष्ट करून स्वत:ला फिट ठेवले आहे. परंतू विराट आता भारताचा सर्वात तंदुरूस्त खेळाडू राहिला नसून त्याची जागा घेतली आहे करून नायरने.
करूण नायरने क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की त्याला भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसुने स्वत: सांगितले की तु टीम इंडियातील सर्वात फिट खेळाडू आहेस.
करुण पुढे बोलताना म्हणाला कि त्यांनी मला फिटनेससाठी खुप मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या बरोबर मी माझा सरावाचा बराच वेळ घातला आहे. तसेच भारतीय संघाचे फलंदाजीतील प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून देखील आपल्याला नेट मध्ये सराव करताना मार्गदर्शन मिळाले आहे. भारतीय संघातील सर्वात फिट खेळाडू असल्याचा आपल्याला आंनद होत आहे.
करुण नायरचा वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात समावेश करण्यात आलाले नाही. त्याचबरोबर भारतच्या इंग्लंड दौऱ्यातही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचे जून 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटीत बऱ्यात काळानंतर कसोटी टीममध्ये पुन्हा स्थान मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-टाॅप ५: या देशाकडे आहेत सर्वाधिक ३०० वन-डे सामने खेळलेले खेळाडू
–आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ