---Advertisement---

चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, स्टार खेळाडूने 48 चेंडूत ठोकल्या तब्बल 124 धावा

---Advertisement---

भारताचा अनुभवी स्टार फलंदाज करुण नायरने सोमवारी महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये विस्फोटक खेळी खेळली. म्हैसूर वॉरियर्सच्या कर्णधाराने मंगलोर ड्रॅगन्सच्या गोलंदाजांना धो धो धुतले. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नायरने 48 चेंडूत नाबाद 124 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 9 षटकार आणि 13 चौकार ठोकल्या. नायरच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर म्हैसूरने 226/4 अशी मोठी धावसंख्या उभारली. नायरने भारतीय संघासाठी कसोटीत त्रिशतक झळकावले आहे. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. मात्र, नायर बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे.

म्हैसूर वॉरियर्स विरुद्ध ड्रॅगन्स सामन्यात 32 वर्षीय नायरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. नाणेफेक गमावल्यानंतर वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अजित कार्तिक 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा स्थितीत नायरने मोर्चा सांभाळला. त्याने एसयू कार्तिक (23) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. समित द्रविडने 16 आणि सुमित कुमारने 15 धावांचे योगदान दिले. नायरने सुमितसोबत चौथ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. 16व्या षटकात सुमितने आपली विकेट गमावली. यानंतर नायरने मनोज भंडागे (नाबाद 31) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 85 धावांची अखंड भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.

डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 धावा करत करुण नायर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मार्च 2017 मध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली आणि संघात पुनरागमन केले नाही. मात्र, नायरने भारतीय संघात पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. “रोज सकाळी उठणे आणि कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याचे स्वप्न पाहणे अजूनही रोमांचक आहे,” अस ही तो म्हणाला.

नायरने अलीकडेच मीडियाला बोलताना सांगितले, “मला वाटते की मी पूर्वीप्रमाणेच फलंदाजी करत आहे. माझी मानसिक स्थिती चांगली आहे, माझा खेळ कुठे आहे हे मला माहीत आहे. मी फक्त याची खात्री करत आहे की मला संधी मिळाल्यास, ती कुठेही असली तरी, मी त्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करतो जेणेकरून मी पुन्हा वर जाऊ शकेन”.

हेही वाचा-

आता गौतम गंभीरची जागा झहीर खान घेणार? अहवालात मोठा खुलासा
कोलकाता प्रकरणावरून सौरव गांगुलीचा चढला पारा, पोस्ट व्हायरल
दुलीप ट्राॅफीमध्ये रिंकूला का नाही मिळाली संधी? स्वत:च केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---