पुणे। प्रो कबड्डीचा सहाव्या मोसमात सोमवारी (26 नोव्हेंबर) 84 वा सामना बंगळूरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा या संघात पार पडला. या सामन्यात बंगळूरु बुल्सने यूपी योद्धाचा 37-27 अशा फरकाने पराभव केला.
या सामन्यात बंगळूरुचा स्टार रेडर काशिलिंग अडकेने चार गुण मिळवले. याबरोबरच त्याने प्रो कबड्डीच्या इतिहासात एक खास विक्रम रचला आहे.
त्याने प्रो कबड्डीच्या इतिहासात 600 गुण मिळवण्याचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे हा टप्पा पार करणारा तो पहिलाच महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे. तसेच एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे.
काशिलिंगने हा पराक्रम त्याच्या 86 व्या सामन्यात केला आहे. त्याने प्रो कबड्डीत खेळलेल्या 86 सामन्यात 551 गुण रेडींगमधून घेतले आहेत. तर 49 गुण हे टॅकलचे आहेत.
याआधी प्रो कबड्डीमध्ये राहुल चौधरी, परदीप नरवाल, अजय ठाकूर आणि दीपक हुडा यांनी 600 गुणांचा टप्पा पार केला आहे.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे कबड्डीपटू:
797 – राहुल चौधरी (90 सामने)
778 – परदीप नरवाल (77 सामने)
688 – अजय ठाकूर (95 सामने)
680 – दीपक हुडा (93 सामने)
600 – काशिलिंग अडके (86 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–मिताली राजचा प्रशिक्षकांवर मोठा आरोप, संघातून वगळण्याबाबत केला मोठा खूलासा
–भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
–वाढदिवस विशेष: टी२० स्टार सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?