महिला टी-२० चॅलेंज ज्याला “मिनी आयपीएल” असेही संबोधले जाते. ती महिला आयपीएल स्पर्धा यावेळी यूएईमध्ये होणार आहे. यूएईमध्ये सध्या पुरुष आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु आहे. सर्व महिला खेळाडू २२ ऑक्टोबरला यूएईसाठी रवाना होतील. या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने यूएईतील शारजाह मैदानावर खेळले जातील. महिलांच्या या मिनी आयपीएलमध्ये चंदीगडची १६ वर्षांची वेगवान गोलंदाज काशवी गौतम खेळताना दिसेल.
बीसीसीआयने केला फोन
या युवा वेगवान गोलंदाजच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारण बीसीसीआयने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी फोनद्वारे संपर्क केला होता. महिला आयपीएल म्हणजेच महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा १० नोव्हेंबर पासून शारजाह क्रिकेट स्टेडियम संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये खेळली जाईल. यूएईमध्ये जाण्यापूर्वी काशवीने कोविड-१९ चाचणी केली.
यामुळे आली चर्चेत
फेब्रुवारी २०२० मध्ये १९ वर्षाखालील महिला वनडे चषकातील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तिने अरुणाचल प्रदेश संघाला एकटीने बाद केले होते. त्यावेळी तिने ४.५ षटकांत १ निर्धाव षटक टाकून फक्त १२ धावा दिल्या आणि १० गडी एकटीने बाद केले. तसेच तिने एक हॅट्रिक पण मिळवली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिला महिला खेळाडू ठरली.
९ नोहेंबरला अंतिम सामना
पुरुष आयपीएल स्पर्धेचे लीग सामने संपल्यानंतर महिला आयपीएल स्पर्धेला सुरूवात होईल. त्यावेळी पुरुष संघ प्ले ऑफ मधील सामने खेळत असणार. महिला आयपीएल २०२० स्पर्धेचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला, तर पुरुष आयपीएल २०२० स्पर्धेचा अंतिम सामना १० नोहेंबरला खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी
-चेन्नई सुपर किंग्ज संघातील दुसरा धोनी? जाणून घ्या कोण आहे ‘तो’ खेळाडू
-आयपीएलमध्येही बोलू मराठीतच; झहीर खान बीडच्या ‘या’ खेळाडूला देतोय मराठीत गोलंदाजीचे धडे
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-कधीकाळी खेळपट्टी तयार करणारा गाजवतोय आयपीएल, वाचा त्याच्या संघर्षाची कहानी