---Advertisement---

विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आहे, हे तर आमचे भाग्यच, पाहा कोण म्हणतंय

On: रविवार, नोव्हेंबर 8, 2020 5:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामात शुक्रवारी(६ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे गेले १३ वर्षे बेंगलोर आयपीएल खेळत असून एकदाही त्यांना आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे गेले ८ वर्षे या संघाच्या नेतृत्वाची धूरा वाहणाऱ्या विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र बेंगलोरच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने विराटला पाठिंबा दर्शवला आहे.

भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने देखील म्हटले होते की विराटला बेंगलोरच्या कर्णधारपदावरुन काढून टाकायला हवं. मात्र, विराटला पाठिंबा देताना बेंगलोरचे मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक सिमॉन कॅटिच यांनी वेबिनारमध्ये म्हटले की ‘नेतृत्त्वाच्या दृष्टीने पाहायचे झाले तर आम्ही भाग्यशाली आहोत, की तो कर्णधार आहे. तो अत्यंत व्यावसायिक आहे आणि संघाकडून त्याला आदरच मिळतो.’

तसेच कॅटिच म्हणाले, ‘त्याने युवा खेळाडूंशी विशेषत: देवदत्त पाडीकल यांच्याबरोबर त्याने बराच वेळ घालवला. ही अशी गोष्ट आहे जी बरेच लोक पाहत नाहीत. आम्ही स्पर्धेत सहभागी झालो आणि शेवटपर्यंत लढा दिला. त्याचे सर्वाधिक श्रेय विराटला जाते.’

तसेच बेंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांना संघाच्या पुढील योजनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही संघाच्या कामगिरीचा आढावा घेऊ आणि मग निर्णय घेऊ. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ‘

महत्त्वाच्या बातम्या –

वेळ पडली तर पंतप्रधान मोदींकडे करणार शमीच्या कुटुंबीयांची तक्रार, हसीन जहां भडकली

IPL Qualifier 2: फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्ली-हैदराबाद आमने-सामने; असे असू शकतात ११ जणांचे संघ

‘एबी डिविलियर्स सोबतची ‘ती’ आठवण आयुष्यभर जपून ठेवेन,’ चहलच्या होणाऱ्या पत्नीची भन्नाट पोस्ट 

ट्रेंडिंग लेख –

RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---