या वर्षाच्या सुरुवातीला यश धूलच्या नेतृत्त्वाखालील युवा भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. या विश्वविजेत्या भारतीय संघात जुन्नर तालुक्यातील कौशल तांबे याचाही समावेश होता. त्यानेही या स्पर्धेत खेळताना त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. आता तो आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघात नेट गोलंदाज म्हणून सामील झाला आहे.
खरंतर १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघातील अनेक खेळाडू आयपीएल २०२२ साठी (IPL 2022) फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात सहभागी होते. यात कौशलचाही समावेश होता. पण एकिकडे यश धूल, राज बावा, राजवर्धन हंगरेकर अशा खेळाडूंवर मोठी बोली लागली, मात्र, कौशलवर (Kaushal Tambe) या लिलावात बोली लागली नव्हती. त्याची २० लाख ही मुळ किंमत होती.
पण, आता असे असले तरी, तो नेट गोलंदाज (net bowler) म्हणून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात सहभागी होणार असल्याने त्याला रिषभ पंत, रिकी पाँटिंग, शेन वॉटसन, अजित अगरकर, प्रविण आमरे अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कौशलचे वडील सहायक पोलिस आयुक्त असून आई वकील आहे. त्याचे वडील मोठे क्रिकेटप्रेमी आहेत. त्याचमुळे त्यांनी कौशललाही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी प्रेरणा दिली. कौशलनेही क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवत भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. तो २०२२ च्या १९ वर्षांखालील एशिया कप आणि विश्वचषक विजेच्या संघाचा भाग होता. तो एशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात सामनावीर पुरस्कारही जिंकला होता.
कौशलने आत्तापर्यंत महाराष्ट्र संघाचे विविध वयोगटात प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १६ वर्षाखालील पश्चिम विभागीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावली होती. विनू मंकड ट्रॉफी आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ
युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट केले हॅक? स्वत:लाच फ्रँचायझीचा बनवले नवा कर्णधार
भारत चौरंगी मालिका खेळण्यास तयार झाला नाही, तर काय करणार पाकिस्तान? रमीज राजाने केले स्पष्ट