---Advertisement---

फायनल पराभवानंतर काव्या मारननं दिली प्रतिक्रिया म्हणाली, “तुम्ही सर्वांनी टी20 क्रिकेट…” पाहा व्हिडीओ

On: मंगळवार, मे 28, 2024 11:48 AM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी, (26 मे) रोजी झालेल्या फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) हैदराबादचा  पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादची संघ मालक काव्या मारनला अश्रू रोखून धरता आले नाहीत.  यादरम्यान, काव्यानं संघातील खेळाडूंशी चर्चा केली. काव्याच्या संभाषणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  

सनरायझर्स हैदराबादनं (SRH) एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काव्या मारन तिच्या संघाचे कौतुक करताना दिसत आहे. तिच्या संघानं फलंदाजीचे सर्व रेकाॅर्ड मोडीत काढल्याचा तिला खूप आनंद आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ गेल्या वर्षी गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. आणि यावेळी हैदराबादनं अंतिम फेरी गाठली. काव्यालाही याचा खूप आनंद झाला.

 

काव्या मारन म्हणाली, “सर्वांना अभिमान वाटला. हेच सांगायला मी इथे आले आहे. तुम्ही सर्वांनी टी20 क्रिकेट खेळण्याचा मार्ग सर्वांना दाखवला. आणि प्रत्येकजण आपल्या संघाबद्दल बोलत आहे. आजचा दिवस वाईट होता. पण तुम्ही या हंगामात अप्रतिम काम केलं. तुम्ही सर्वांनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.”

काव्या मारन पुढे म्हणाली, “आणि मला वाटते की गेल्या वर्षी आपण गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होतो. परंतु तुम्हाला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानात आले. याचं कारण तुमच्या सर्वांमध्ये असलेली क्षमता आहे. तुम्ही या हंगामात केलेली उत्कृष्ट कामगिरी आहे. परंतु तरीही केकेआर संघ जिंकला. आणि मला खात्री आहे की, प्रत्येकजण आपल्या खेळण्याच्या कामगिरीवर बोलेल. स्वतःची काळजी घ्या. आपण फायनल खेळलो. इतर सामन्यांसारखा तो सामना नव्हता. मला काय म्हणायचे आहे. ते आज इतर सर्व संघ पाहत होते. मी तुम्हाला लवकरच भेटेन.”

महत्त्वाच्या बातम्या-

बीसीसीआय सचिव जय शाहांची मोठी घोषणा! ग्राउंड्समन आणि पिच क्युरेटर्सना मिळणार 25 लाख रुपये

“केकेआर जिंकली तर ‘ब्रा’ न घातलेला फोटो पोस्ट करेन”, मॉडेलनं पाळला शब्द

टी20 विश्वचषकापूर्वी यजमानांना मोठा धक्का! माजी कर्णधार दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---