नव्या दमाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग याने आयपीएल 2023 हंगाम गाजवला होता. रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका सामन्यादरम्यान अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारून संघाला विजयी केले होते. केकेआरकडून पाच षटकार मारताच रिंकू एका रात्रीत स्टार बनला. त्याने शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) आयर्लंड दौऱ्यावरील टी20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रिंकूने गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात मारलेल्या सलग 5 षटकारांविषयीचा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती 15’ शोमध्ये विचारण्यात आला. हा प्रश्न 6.40 लाख रुपयांसाठी होता.
खरं तर, ‘घूमर’ हा सिनेमा एका महिला क्रिकेटपटूच्या प्रेरणादायी कथेवर आधारित आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशात या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिषेक आणि सैयामी ‘केबीसी 15’ (KBC 15) शोमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांना शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, आयपीएल 2023मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या कोणत्या फलंदाजाने अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारले होते. यासाठी पर्याय होते, ए- आंद्रे रसेल, बी- नीतिश राणा, सी- रिंकू सिंग आणि डी- वेंकटेश अय्यर.
हा प्रश्न वाचल्यानंतर कदाचितच असा कोणता क्रिकेट चाहता असेल, ज्याला याचे उत्तर माहिती नसेल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहिती आहे की, केकेआरचा फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) यानेच आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारले होते. यामुळे स्पर्धेतील 13व्या सामन्यात गुजरात संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. रिंकूने वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारून केकेआरला यादगार विजय मिळवून दिला होता.
Rinku Singh owns KBC. pic.twitter.com/xNONGd80jW
— Silly Point (@FarziCricketer) August 18, 2023
विजयासाठी मिळालेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला अखेरच्या षटकात 29 धावांची गरज होती. यावेळी रिंकू आणि उमेश यादव क्रीझवर होते. यावेळी उमेशने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकूने कारकीर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी साकारली. त्याने 5 षटकार मारत केकेआरला 3 विकेट्सने जिंकून दिले. यादरम्यान त्याने 21 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 48 धावांची विजयी खेळी साकारली.
रिंकूचे आयर्लंड दौऱ्यावर पदार्पण
रिंकूने 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. रिंकूला आयपीएल 2023मध्ये केलेल्या शानदार प्रदर्शनाचे बक्षीस मिळाले. रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णाला कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पदार्पणाची कॅप दिली. (kbc ipl 2023 star rinku singh related question which kolkata knight riders batsman hit 5 consecutive sixes in the last over)
महत्त्वाच्या बातम्या-
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया
पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाच्या पदरी पडला विजय! बुमराहचे यशस्वी पुनरागमन