---Advertisement---

आयपीएल लिलाव : अखेर केदार आणि हरभजन यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले; या संघांमध्ये झाले सामील

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 9:21 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव चेन्नई येथे सुरू झालेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी 10 कोटीपेक्षा अधिक रुपयांची बोली मिळवत आतापर्यंत लिलाव गाजवला आहे. हरभजन सिंग व केदार जाधव यांच्यासारख्या भारतीय खेळाडूंच्या पदरी मात्र निराशा पडली होती. परंतु, लिलावाच्या अखेरीस येता येता या दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

भारतीय दिग्गजांवर लागली बोली

पहिल्या फेरीमध्ये भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगवर कोणीही बोली लावली नव्हती. मात्र, दुसऱ्या फेरीमध्ये कोलकता नाईट रायडर्सने आधारभूत किमतीत म्हणजे २ कोटी रुपयात त्याला खरेदी केले. हरभजनने यापूर्वी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

हरभजन सारखीच काहीशी कहानी भारताचा अष्टपैलू केदार जाधव याची राहीली. पहिल्या फेरीत विकला न गेल्यानंतर केदारला दुसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबाद संघाने २ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून. केदार मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता.

इतर खेळाडूंवर लागली बोली

हरभजन सिंग व केदार जाधव व्यतिरिक्त करूण नायर, सॅम बिलिंग्स, बेन कटींग या टी२० स्पेशालिस्ट खेळाडूंवर देखील बोली लावली गेली. न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरी ऍन्डरसन, वेस्ट इंडीजचा रोवमन पॉवेल हे देखील विकले गेले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---