आयपीएलमुळे वेगवेगळ्या संघात असले तरी भारतीय संघात संघमित्र असलेल्या दोन क्रिकेटपटूंच्या इंस्टाग्रामवरील मराठी संभाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतीय संघातील हे दोन क्रिकेटपटू आहेत मुंबई इंडीयन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज केदार जाधव. या दोन मित्रांनी मराठीत केलेली विचारपूस सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे.
केदार हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे यावर्षीच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे गेला आहे.
मेलबर्नला गेलेल्याचा फोटो केदारने इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोवर कमेंट करताना रोहितने केदारला ” तिकडे काय आहे मित्रा?” असे विचारले आहे.
यावर केदारने उत्तर देताना म्हटले आहे की “सर्जरीसाठी आलोय मित्रा”
या दोघांच्या इंस्टाग्रामवरील या मराठी संभाषणाने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली