क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक खेळण्यासाठी युएसए दौऱ्यावर आहे. अशात भारतीय संघाचा एकेकाळी प्रमुख खेळाडू राहिलेल्या केदार जाधव याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
सोशल मीडिया अकाउंटवर एक धन्यवाद पोस्ट टाकून केदार जाधवने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. केदार जाधव हा मागील अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघात दिसला नव्हता. परंतू लीग क्रिकेटमध्ये मात्र तो खेळत होता. आताही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएल 2024 स्पर्धेत तो खेळत आहे. परंतू या दरम्यान त्याने क्रिकेटला अलविदा करत असल्याची पोस्ट करत असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Thank you all For your love and support throughout my Career from 1500 hrs
Consider me as retired from all forms of cricket— IamKedar (@JadhavKedar) June 3, 2024
केदार जाधव हा मूळचा पुणे शहरातील आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केलंय. केदार जाधवने भारताकडून 73 वनडे, 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तर 95 आयपीएल सामने खेळले आहेत. केदारच्या नावावर वनडेत नावावर 1389 धावा आहेत. तर टी20 मध्ये 122 धावा आहेत.