इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात गुणतालिकेत तळाशी असलेले दोन्ही संघ पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भिडत आहेत. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या महत्त्वाच्या सामन्यात सनरायझर्सने संघात तीन बदल केले. भारताचा अनुभवी अष्टपैलू केदार जाधव या सामन्यातून सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण करताना दिसेल.
हैदराबादच्या संघात तीन बदल, केदारचे पदार्पण
हंगामातील चौथ्या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघात तीन बदल केले. खराब फॉर्ममध्ये असलेल्या मनिष पांडे व अब्दुल समद यांच्याजागी वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल व अष्टपैलू केदार जाधवला संधी देण्यात आली. मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केल्यानंतरही मुजीब उर रहमानला विश्रांती देत फलंदाजी मजबूत करण्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा संघात समावेश केला गेला.
या सामन्यातून अनुभवी अष्टपैलू व आक्रमक फलंदाज केदार जाधव सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण करत आहे. केदारने यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोची टस्कर्स केरला, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला करारमुक्त केले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर ७५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
.@JadhavKedar is all set to make his debut in the #SRH colours 👌👌
Follow the game here – https://t.co/PsUV2KPwvf #VIVOIPL pic.twitter.com/VxBi6fa56Y
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
केदारची आयपीएल कारकिर्द
पुणेकर केदार जाधव २०१० पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. यादरम्यान त्याने ८७ सामने खेळताना ११४१ धावा काढल्या आहेत. यासोबतच त्याने काही काळ यष्टिरक्षक म्हणून देखील संघांसाठी भूमिका पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेक जिंकून पंजाबचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, केदार जाधवचे हैदराबादकडून पदार्पण
रोहितसाठी ओला चेंडू बदलला, मग राहुलसोबतचं अन्याय का? भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न