---Advertisement---

‘बॉक्स ऑफिसमध्ये सलमान आणि मोठ्या सामन्यात…’, जुना संघसहकारी केदारकडून धोनीचे खास शब्दांत कौतुक

On: सोमवार, ऑक्टोबर 11, 2021 11:22 AM
---Advertisement---

रविवारी (१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. क्वालिफायरच्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात निर्णायक क्षणी चौकार मारणाऱ्या एमएस धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आणि धोनीचा माजी संघ सहकारी केदार जाधवने देखील त्याचे तोंडभरून कौतुक करत एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधत आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने ‘फिनिशर’ म्हणून वेगळी ओळख बनवली आहे. अनेकदा संघ अडचणीत असताना त्याने फलंदाजीला येऊन संघाला विजय मिळवून दिला आहे. धोनीचे विस्फोटक रूप या सामन्यात देखील पाहायला मिळाले होते. धोनीने या सामन्यात ६ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला होता.

या सामन्यात १७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला शेवटच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी धोनीने टॉम करणच्या षटकात ३ चौकार मारत चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर धोनीचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. अगदी केदार जाधवने देखील ट्विट करत धोनीचे कौतुक केले आहे.

त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मोठ्या पडद्यावर सलमान खान आणि मोठ्या सामन्यात एमएस धोनी असेल तर संपूर्ण भारत जल्लोष साजरा करतो आणि करत राहील.” केदार जाधवने गेली काही वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर या हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघात आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉ ने तुफानी ६० धावांची खेळी केली. तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना, ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूंमध्ये सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने ६३ धावांचे योगदान दिले. तर शेवटी एमएस धोनीने जोरदार आक्रमण केले. त्याने नाबाद १८ धावांची खेळी करत, षटकार मारून चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ गडी राखून सामना जिंकून दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोण म्हणतं धोनी सोप्या मॅच अवघड करतो? आकडे तर वेगळंच काहीतरी सांगतायेत

नाद विक्रम..! आयपीएलच्या प्रत्येक फ्रँचायझीला चोप देत सामनावीराच्या ‘या’ किर्तीमानात ऋतुने केलाय ‘राज’

Video: मॅचचं पारडं फिरवणाऱ्या राॅबिन उथप्पाचा श्रेयस अय्यरने सीमारेषेवर घेतला ‘सुपर कॅच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---