कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना सेंट लुसिया किंग्ज आणि किट्स एंड नेविस या बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाने सेंट लुसिया किंग्ज संघाला ३ गडी राखून पराभूत करत कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यातील पहिल्या डावात सेंट लुसिया किंग्ज संघातील फलंदाजाने नसीम शहाच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार मारला होता, ज्यानंतर गोलंदाजाला संताप अनावर झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्यात सेंट लुसिया किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत सेंट लुसिया किंग्ज संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या संघाकडून कॉर्नवॉल आणि रोस्टन चेसने प्रत्येकी ४३ -४३ धावांची खेळी केली. तर शेवटी किमो पॉलने चौफेर फटकेबाजी करत ३९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ गगनचुंबी षटकार मारले. या खेळीच्या जोरावर सेंट लुसिया किंग्ज संघाला २० षटक अखेर ७ बाद १५९ धावा करण्यात यश आले होते.
नसीम शहाला राग अनावर
किमो पॉलने या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. त्याने आपल्या खेळीदरम्यान ५ षटकार मारले होते. दरम्यान पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शहाच्या शेवटच्या षटकात त्याने ८ धावा केल्या. या षटकात त्याने नसीमला एक षटकार देखील मारला होता. आपल्या गोलंदाजीवर फलंदाजाने षटकार मारला हे नसीम शहाला बघवले नाही.
त्यामुळे त्याने पॉलला काहीतरी म्हटले. त्यानंतर सेंट लुसिया किंग्ज संघाचा डाव संपल्यानंतर जेव्हा पॉल ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता, त्यावेळी देखील नसीम शहाने त्याला काहीतरी म्हटले. त्यानंतर पॉलने देखील पलटवार करत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. (Keemo Paul hits three consecutive sixes in cpl final 2021)
Off you go‼️
Things are getting spicy here between the @sknpatriots and the @SaintLuciaKings! #CPL21 #CPLFinal #SKNPvSLK #CricketPlayedLouder pic.twitter.com/LoGkw2aIm0— CPL T20 (@CPL) September 15, 2021
सेंट किट्स एंड नेविस संघाचा विजय
सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात १६० धावांची आवश्यकता होती. दरम्यान सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघातील सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल आणि एविन लुईस हे स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर जोशुआ डि सिल्वाने ३७ धावांची खेळी करत सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटी डॉमिनिक ड्रेक्सने ३ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने नाबाद ४८ धावांची खेळी केली. तसेच फेबिअन एलेनने देखील २० धावांचे बहुमूल्य योगदान देत हा सामना सेंट किट्स एंड नेविस संघाला ३ गडी राखून जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजाने चेंडूच इतका खतरनाक टाकला की, स्टंपने केला डिस्को डान्स!! फलंदाज ब्रावोही चकित
मुंबईविरुद्ध सर्वाधिक तळपलीय चेन्नईच्या ‘थाला’ अन् ‘चिन्ना थाला’ची बॅट, पाहा टॉप-५ मधील इतर नावे