मुंबई। आज ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन बाद झाल्यानंतर एक मजेदार गोष्ट पहायला मिळाली.
या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली होती. शिखर आणि रोहित शर्मा यांनी 71 धावांची सलामी भागीदारी रचली होती. पण 12 व्या षटकात किमो पॉल या गोलंदाजाला ही भागीदारी तोडण्यात यश आले.
शिखरने या षटकातील पाचव्या चेंडूवर मारलेला फटका मिड विकेटला उभ्या असलेल्या कायरन पॉवेलने झेलला. त्यामुळे शिखर 38 धावा करुन बाद झाला.
पण त्याला बाद केल्यानंतर गोलंदाज किमो पॉलने सेलिब्रेशन करताना शड्डू ठोकण्याची शिखरचीच स्टाईल वापरली. त्याला असे सेलिब्रेशन करताना पाहून शिखरलाही त्याचे हसू लपवता आले नाही.
Watch | Keemo Paul giving it back to @SDhawan25. Mocks him with thigh-five celebration.#INDvWI #dhawan #thighfive #gabbar pic.twitter.com/E0tAYVbFLc
— Anirudh Kumar (@Anirudhvyahut) October 29, 2018
शिखर जेव्हाही झेल घेतो तेव्हा शड्डू ठोकून सेलिब्रेशन करतो. त्यामुळे किमो पॉलने शिखरला बाद केल्यानंतर असे सेलिब्रेशन केले.
महत्त्वाच्या बातम्या:
–७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला
–ब्रेबॉर्नवर होणाऱ्या ऐतिहासिक वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
–ISL 2018: जमशेदपूरचे प्रशिक्षक फरांडो यांच्यासाठी आता प्रत्येक लढत म्हणजे फायनलच