भारत देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असून येथे असंख्य क्रिकेटपटू देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या संधीच्या प्रतिक्षेत असतात. अशाच काही अनुभवी आणि युवा क्रिकेटपटूंना भारताचा विद्यमान कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने महत्त्वाचा सल्ला दिला (Rohit Sharma Advise To India Aspirant) आहे. जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट, जसे की रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळतात, त्यांनी या स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करत राहावे. राष्ट्रीय संघातील निवडीबद्दल जास्त काळजी करू नका, कारण संधी निर्माण होत राहणार आहे, असे रोहित म्हणाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधार रोहितचा (Test Captain Rohit Sharma) व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ श्रीलंका दौऱ्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतील असून त्याला १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धूल आणि सरफराज खान यांच्या रणजी ट्रॉफीतील शतकी खेळीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना तसेच भारतीय संघाकडून खेळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूंचा उद्देशून म्हणतो आहे, “मी त्या सर्वांना हेच सांगू इच्छितो की, तुम्ही सातत्याने धावा करत राहा. कारण नेहमी संधी निर्माण होत राहणार आहेत. जसे की, रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणारे हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि बरेच खेळाडू आता भारताच्या कसोटी संघाचा भाग आहेत. तुम्हाला फक्त धावा करत राहायचे आहे. लोक तुम्हाला काय म्हणतात, याकडे लक्ष न देता मान खाली घालून पूर्ण मेहनतीने तुमचे काम करत राहायचे. सध्याच्या घडीला मी तुम्हाला हेच सांगू शकतो.”
तसेच रोहित पुढे म्हणाला की, “भविष्यात कधी-ना-कधी संधी निर्माण होतील. तेव्हा नक्कीच तुमची आठवण काढली आहे. त्यामुळे अजिबात तुमच्या निवडीबद्दल चिंता न करता जास्तीत जास्त धावा करण्याकडे भर द्या.”
कर्णधार रोहितने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर बरेच संकेत पुढे येत आहेत. त्याने युवा शिलेदारांबरोबरच कदाचित अनुभवी कसोटीपटू अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांच्यासाठीही हे भाष्य केले आहे. कारण हे खेळाडू त्यांचा बिघडलेला फॉर्म सुधारण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळत आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1496427219916574721?s=20&t=gnbioNUSFMsZWlKJ0HNm6w
तसेच पुढे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन निवडीबद्दल कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा लागतात, याविषयीही कर्णधार रोहित बोलला आहे. तसेच आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
“प्लेइंग इलेव्हनची निवड करताना, संघात कोणते खेळाडू आहेत, संघाचे संतुलन कसे मजबूत बनेल, खेळपट्टी कशी आहे, विरोधी संघ कोणता आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्हाला पुढे ३ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यातील श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांसाठी संघ निश्चित झाला आहे. उर्वरित इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठीचा संघ नंतर ठरवला जाईल,” असे रोहितने म्हटले आहे.
भारत आणि श्रीलंकेतील कसोटी मालिका ४ मार्च ते १६ मार्च दरम्यान खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर
आनंदही आनंद गडे! ३ महिन्यांनंतर अष्टपैलू जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन, टी२० मालिकेसाठी आहे उत्साहित






