4 आॅक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला विंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोच मुकणार आहे.
केमार रोचच्या आजीचे निधन झाल्याने तो पुन्हा बार्बाडोसला परतला आहे. त्यामुळे त्याला राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. तो पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पुन्हा विंडिज संघात दाखल होईल.
याविषयी विंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले की “केमार अजून परत आलेला नाही. त्याच्या कुटुंबात दुखद घटना घडली आहे. तो पहिला कसोटी सामना सुरु असताना संघात दाखल होईल.”
“केमार रोच हा अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे चांगली शैली आहे. तो आमच्या संघातील नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची अनुपस्थिती नक्कीच नुकसान दायक आहे. पण शॅनन गॅब्रियलने मागील काही कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. या कसोटी सामन्यात भारतासारखीच परिस्थिती होती.”
तसेच लॉ पुढे म्हणाले, ‘केमारची अनुपस्थिती असली तरी आमच्याकडे किमो पॉल आणि शर्मन लेविससारखे प्रतिभावान गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजी हीच आमची ताकद आहेत.”
केमार रोचने कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 28.31 च्या सरासरीने 163 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गॅब्रियल, कर्णधार जेसन होल्डर, किमो पॉल आणि शर्मन लेविसवर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या युवराजचे शतक हुकले
–…म्हणून करुण नायर म्हणतो; तरी झाली कुठं चूक, माझी मला कळंना!!!
–करुण नायरने करुन दाखवले, विराटलाही मागे टाकले