सध्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने मोठ्या अंतराने आपल्या नावावर केला. असे असले तरी, दुसऱ्या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन याच्या संबंधित एक दुःखद बातमी समोर येत आहे.
न्यूझीलंड क्रिकेटमधील महान फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली. दुखापतीतून सारवल्यानंतर विलियम्सन आता पूर्णपणे आपल्या जुन्या रुपात परतल्याचे दिसत आहे. पण अशातच रविवारी (11 फेब्रुवारी) केन विलियम्सनवर दुःखाचा डोंगर कोसळला. विलियम्सनचा ‘फॅमेली मेंबर’ असलेला कुत्रा निधन पावला आहे. विलम्यसनने स्वतः याविषयी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून विलियम्सनने लिहिले की, “सांगताना खूप वाईट वाटत आहे की, वयाच्या 16व्या वर्षी आम्हीला आमच्या प्रिय सँडीला अलविद म्हणावे लागले. आम्ही तिला 8 वर्षांची असताना पाळले होते. ती आमच्या आयुष्यात आली आणि घरातील एक सदस्य बनली. तिने अनेक आनंदाच्या आठवणी दिल्या आहेत. त्यासाठी तिचे धन्यवाद. तुझी आठवण येईल सँडी.” विलियम्सनची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलाची व्हायरल झाली आहे. चाहते कमेंट्समध्ये सँडीच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, विलियम्सनसाठी त्याचा कुत्रा सँडी खूपच प्रिय होता. दोघांमधील नाते हे खुपच जवळचे होते. कोरोना काळात लॉकडाऊन असताना विलियम्सन घरी होता. त्यावेळी सँडीसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
View this post on Instagram
दरम्यान, विलियम्सन संध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 118 आणि 109 धावांची खेळी केली. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा विलियम्सन न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील पाचवा खेळाडू बनला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील विलियम्सन आपला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. जर विलियम्सनची बॅट पुढच्या सामन्यात देखील तळपली, तर न्यूझीलंड संघ या मालिकेत 2-0 अशा फरकाने जिंकू शकतो. (Ken Williamson’s pet dog Sandy passes away)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG Rajkot 3rd Test Playing 11: तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा-केएल राहुल बाहेर बसणार का? अशी असणार प्लेइंग 11
U19 Word Cupमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू, पराभवानंतर भारतीय खेळाडू टॉपवर