कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तब्बल ४ महिन्यांनंतर सुरु झाले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात ऐतिहासिक कसोटी सामना खेळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसनंतरचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे यावर कसोटीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता ‘केंट क्रिकेट’ ने (इंग्लंड क्रिकेट क्लब) इंग्लंडच्या जो डेनलीची तुलना विराट कोहलीशी करत एक पोस्ट शेअर केली आहे. परंतु चाहत्यांनी या क्लब क्रिकेटला त्याच अंदाजात पलटवार दिला आहे.
जो डेनलीची विराटशी तुलना
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England and West Indies) संघात सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामना साऊथँप्टनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २०४ धावांवर संपुष्टात आला होता. या आव्हानाचा सामना करताना विंडीजने ३१८ धावा केल्या.
या सामन्याबरोबरच चाहत्यांचा आनंदही परतला आहे. परंतु यादरम्यान केंट क्रिकेट क्लबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी इंग्लंडच्या डेनली (Joe Denly) आणि विराटची (Virat Kohli) तुलना करत लिहिले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केले आहे, तेव्हापासून विराटने ० धावा केल्या आहेत, तर डेनलीने १४ धावा केल्या आहेत.”
Runs since lockdown began:
Joe Denly: 1️⃣4️⃣
Virat Kohli: 0️⃣🤷♂️🤷♂️🤷♂️ #SuperKent pic.twitter.com/kS8sHt06b0
— Kent Cricket (@KentCricket) July 8, 2020
परंतु या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीही केंट क्लब क्रिकेटला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.
england current test squad total ODI runs 7313 and @imVkohli total ODI runs 11867
— Poorna Chandra K.J (@kjpoornachandra) July 11, 2020
Can’t argue with facts
— Brad Walker (@BradWalker7) July 9, 2020
I dunno. I reckon Vitat Kohli will have had the runs a few times since lockdown…
— Gareth Nokes (@nokesy) July 9, 2020
डेनलीने त्या सामन्यात ५८ चेंडूत १८ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार, पण मला कमबॅक करण्याची संधी द्या!
-फक्त इंग्लंड संघानेच नाही, वेस्ट इंडिज पुढे अंपायरनेही टेकले गुडघे
-२१ व्या शतकात कसोटीत एकही नो बॉल न टाकणारे २ दिग्गज गोलंदाज