fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त इंग्लंड संघानेच नाही, वेस्ट इंडिज पुढे अंपायरनेही टेकले गुडघे

July 11, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

८ जुलैपासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना साऊथँम्पटन येथे सुरु झाला आहे. या सामन्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ११७ दिवसांनंतर सुरुवात झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून चांगला खेळ पहायला मिळाला. या सामन्यात पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला होता. परंतु नंतर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या डावात शानदार खेळ केला.

त्यांनी पहिल्या डावात ११४ धावांची आघाडीही घेतली आहे. पण या सामन्यादरम्यान पंचांचे अनेक निर्णय चूकल्याचे दिसून आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१० जूलै) वेस्ट इंडिजच्या संघाने तब्बल ५ वेळा डिआरएस रिव्ह्यूचा वापर केला. पण धक्कादायक म्हणजे यातील ४ वेळा पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.

या सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो हे दोघे पंच म्हणून काम पाहत आहेत. यावेळी त्यांनी अनेकदा वेस्ट इंडिजच्या विरुद्ध निर्णय दिले. पण वेस्ट इंडिजने डिआरएसचा वापर करत हे निर्णय पंचांना बदलायला लावले.

वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी गोलंदाजीदरम्यान ३ यशस्वी डिआरएस रिव्ह्यू घेतले. यातील पहिला रिव्ह्यू त्यांनी जेव्हा पंचांनी शॅनन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर रॉरी बर्न्सला नाबाद दिले तेव्हा घेतला. गॅब्रियलने टाकलेला तो चेंडू बर्न्सच्या पॅडला लागला होता. पण पंचांनी त्याला नाबाद दिले. परंतू डिआरएसमध्ये तो बाद असल्याचे दिसले.

त्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने टाकलेला ३३ व्या षटकातील एक चेंडू जॅक क्रॉलीच्या पॅडवर लागला, पण तेव्हाही पंचांनी क्रॉलीला नाबाद दिले. त्यामुळे पुन्हा एकदा वेस्ट इंडिजने डिआरएस रिव्ह्यू घेतला. त्यात क्रॉली बाद असल्याचे दिसले. यानंतर ५७ व्या षटकातही होल्डरने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या पॅडला लागला होता. तेव्हाही पंचांनी नाबाद दिल्यानंतर डिआरएस रिव्ह्यूमध्ये आर्चर बाद असल्याचे दिसले.

यानंतर फलंदाजीदरम्यानही वेस्ट इंडिजला खराब अंपायरिंगचा फटका बसला होता. यावेळी वेस्ट इंडिजकडून सलामीला फलंदाजी करणाऱ्या जॉन कॅम्पबेलने तीनवेळा डिआरएस रिव्ह्यू घेतला. त्यातील २ वेळा त्याच्या बाजूने निकाल लागला.

पहिल्यांदा जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कॅम्पबेलला बाद देण्यात आले होते. त्यावेळी कॅम्पबेलने शेवटच्या सेंकदाला रिव्ह्यू घेतला होता आणि हा रिव्ह्यू यशस्वी ठरला. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांनी कॅम्पबेलला बाद दिले होते, पण पून्हा एकदा डिआरएस रिव्ह्यूमुळे कॅम्पबेलची विकेट वाचली. पण अखेर १२ व्या षटकात जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कॅम्पबेल पायचीत झाला. यावेळीही त्याने डिआरएस रिव्ह्यू घेतला होता. परंतू यावेळी पंच इलिंगवर्थ यांनी दिलेला बादचा निर्णय योग्य होता.

ट्रेंडिंग घडामोडी –

७३ वर्षांनी क्रिकेटमध्ये असा काही कारनामा झाला की सगळेच विचारात पडले

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांत अँडरसनचा समावेश, पहा पहिले ४ कोण आहेत?

मुंबईकर रहाणे म्हणतो, ‘ती’ गोष्ट केल्याशिवाय गप्प बसणार नाही


Previous Post

२१ व्या शतकात कसोटीत एकही नो बॉल न टाकणारे २ दिग्गज गोलंदाज

Next Post

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ८: सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन करत १५ वर्ष जुन्या पैजेची आठवण करून दिली

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

सॅम करनच्या षटकात पॅट कमिन्सने चोपल्या तब्बल ३० धावा, पाहा डोळे दिपवणाऱ्या फटकेबाजीचा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Screengrab/@Cricsphere
IPL

डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर फेबियन एलनने केला अजब डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ८: सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन करत १५ वर्ष जुन्या पैजेची आठवण करून दिली

आनंदाची बातमी! १८ ऑगस्टपासून सुरू होणार ही लीग, भारतीय खेळाडूही होणार सहभागी

'या' भारतीय व्यक्तीच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरला बेन स्टोक्स

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.