विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा २०२०-२१ ही शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामात फलंदाजांचा बोलबाला होता. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी (०८ मार्च) झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटक आणि केरळ दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात कर्नाटक संघाच्या कर्णधाराने ताबडतोड १९२ धावांची खेळी करत संघात उपांत्य फेरी सामन्यात पोहोचवले आहे.
या हंगामात आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणारा कर्नाटक संघाचा कर्णधार रविकुमार समर्थ याने प्रथम फलंदाजी करताना १२२ च्या स्ट्राइक रेटने एकूण १९२ धावा केल्या. यात अवघ्या २५ चेंडूत २२ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने १०६ धावा चोपल्या. तसेच अवघ्या ८ धावांनी त्याचे दुहेरी शतक हुकले आहे. रविकुमारचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक म्हणून काम करतात. तसेच त्यांना त्यांच्या मुलाच्या कामगिरीवर गर्व आहे.
या सत्रात चोपल्या ६००+ धावा
विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात रविकुमारने ६ डावात तब्बल ६०५ धावा केल्या आहेत. तसेच या स्पर्धेत ६०० पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. या हंगामात त्याने तीन शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहेत. तसेच दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने देवदत्त पडीक्कलसोबत मिळून २४९ धावांची भागीदारी केली. कर्नाटक संघाने ५० षटकांच्या अखेर ३ बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली.
पड्डीकलचे सलग चौथे शतक
या सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देवदत्त पडीक्कलने या सामन्यात देखील शतक झळकावले आहे. त्याने कर्णधार रविकुमार सोबत मिळून पहिला गडी साठी २४९ धावांची भागीदारी केली. तसेच ११८ चेंडूंमध्ये आपले शतक देखील पूर्ण केले. या शतकासह त्याने या हंगामातील सलग चौथे शतक झळकावले आहे आणि मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पडीक्कल विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधित शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतील त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई टोचवून मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ
नव्या हंगामात ‘थाला’ची सेना उतरणार नव्या अंदाजात, पाहा सीएसकेची नवीकोरी जर्सी
आयपीएल २०२१ चं वेळापत्रक झालं घोषित; पंजाब किंग्जची मालकीण म्हणते, ‘हे थोडं विचित्र वाटतंय’






