गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील ‘व्हॅलेंटाइन डे’ स्पेशल सामन्यात (१४ फेब्रुवारी) केरला ब्लास्टर्स एफसीची गाठ तळातील एससी ईस्ट बंगालशी पडेल. ईस्ट बंगालला गमावण्यासारखे काहीही नसले तरी तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्यावर मात करताना अव्वल चार क्लबमध्ये (टॉप फोर) स्थान मिळवण्याचे लक्ष्य केरला ब्लास्टर्सचे आहे.
१४ सामन्यांमध्ये २३ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या केरला ब्लास्टर्सला मागील लढतीत जमशेदपूर एफसीकडून ३-० असा मोठा पराभव पाहावा लागला. अद्याप सहा सामने शिल्लक असल्याने त्यांना ‘प्ले-ऑफ’ फेरी गाठण्याची संधी आहे. शेवटच्या सामन्यांत चेन्नईयन एफसी, मुंबई सिटी आणि एफसी गोवा असे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने सोमवारी तळातील ईस्ट बंगालवर वर्चस्व राखताना पूर्ण तीन गुण वसूल करण्यादृष्टीने केरला डावपेच आखेल. या विजयासह त्यांना थेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी झेप घेण्याची संधी आहे.
एसी ईस्ट बंगालचे आव्हान संपल्यात जमा आहे. त्यांना १६ सामन्यांत केवळ १० गुण मिळवता आलेत. मात्र, उर्वरित चार सामन्यांत खेळ उंचावून ईस्ट बंगालला ‘प्ले-ऑफ’ फेरीची गणिते बिघडवण्याला वाव आहे. मागील लढतीत त्यांनी ओदिशा एफसीला (२-१) झुंजवले. त्या आधी चेन्नईयन एफसीला बरोबरीत (२-२) रोखले होते.
‘सेट पीस’मधील अपयश जास्त गोल करण्यात अडथळा ठरत असल्याचे एससी ईस्ट बंगालचे मुख्य प्रशिक्षक इव्हान वुकोमॅनोविक यांना वाटते. त्याचा फटका एटीके मोहन बागानविरुद्ध बसला. केरलासमोर प्रमुख खेळाडूंची दुखापत आणि बंदीचे संकट आहे. एससी ईस्ट बंगालविरुद्ध त्यांना रुइवा हॉर्मिपॅम, हरमनजोत खाब्रा आणि मार्को लेस्कोविक विना खेळावे लागणार आहे. हे खेळाडू एकतर दुखापतग्रस्त आहेत किंवा बंदीमुळे सामन्याला मुकले आहेत.
ईस्ट बंगालला आठव्या हंगामात छाप पाडता आलेली नाही. १६ सामन्यांत केवळ एकच विजय त्यांच्या नावावर आहे. यावेळचा प्रतिस्पर्धी केरला ब्लास्टर्स तुल्यबळ आहे. शिवाय सर्वसमावेशक आहे. मात्र, आम्ही विजय मिळवण्यादृष्टीने मैदानावर उतरू, असे ईस्ट बंगालचे मुख्य प्रशिक्षक मारिओ रिव्हेरा यांनी म्हटले आहे.
सध्या पिछाडीवर फेकल्या गेलेल्या एससी ईस्ट बंगालने आठव्या हंगामातील पहिल्या लढतीत केरला ब्लास्टर्सला १-१ असे बरोबरीत रोखले आहे. हा प्रतिस्पर्ध्यांसाठी सूचक इशारा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च
अनकॅप्ड महिपाल लोमरोरची चांदी, ‘इतक्या’ लाखांसह आरसीबीत सामील; आयपीएलचा आहे चांगला अनुभव
‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’