इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक 14 मधील संडे ब्लॉकबस्टर्समध्ये (8 जानेवारी) यंदाच्या हंगामात अजिंक्य असलेल्या मुंबई सिटी एफसीसमोर घरच्या मैदानावर म्हणजे मुंबई फुटबॉल अरेनामध्ये फॉर्मात असलेल्या केरळा ब्लास्टर्सचे आव्हान आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने फुटबॉल चाहत्यांचा रविवार संस्मरणीय होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई सिटीने 2022-23 हंगामात पराभव पाहिलेला नाही. 12 पैकी 9 सामने जिंकलेत. उर्वरित तीन सामने ड्रॉ झाले. दुसर्या स्थानी असलेल्या या क्लबच्या खात्यात 30 गुण आहेत. उल्लेखनीय म्हणजे मुंबई सिटीने 9 सामन्यांत सलग 7 विजयांचा समावेश आहे. आयएसएलमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकण्याच्या विक्रमापासून ते केवळ एक विजय दूर आहे. केरळा ब्लास्टर्स हे मुंबई सिटी खालोखाल आहेत. त्यांनी 12 सामने खेळताना 25 गुणांची कमाई केली आहे. केरळाने 8 विजय मिळवलेत. याशिवाय मागील आठ सामन्यांत त्यांनी पराभव पाहिलेला नाही.
पहिल्या लेगमध्ये केरळला मुंबईकडून मात खावी लागली आहे. त्याचा मानसिक फायदा मुंबई सिटीला होमग्राउंडवर खेळताना होईल. उभय संघांचा समावेश असलेल्या मागील पाच सामन्यांचा निकाल पाहता त्यांनी प्रत्येक लढतीत किमान दोन गोल केलेत. त्यातील एकही सामना बरोबरीत सुटलेला नाही. सांघिक कामगिरी उंचावण्यात दोन्ही क्लबच्या आक्रमण फळीचे मोठा वाटा आहे.
मुंबई सिटी एफसीकडे लालियानझुआला छांगटे आणि बिपीन सिंग हे उत्तम भारतीय बचावपटू आहेत. शेवटच्या मॅचवीकमध्ये ओदिशा एफसीला 4-2 असे रोखण्यात या दुकलीने मोलाचे योगदान दिले होते. छांगटे याने दोन गोल करताना एक असिस्ट केला. बिपीनने एक गोल केला. या दोघांच्या कामगिरीमुळे प्रतिस्पर्ध्यांची पिछाडी भरून काढताना मुंबईने विजयाची नोंद केली.
यंदाच्या हंगामात मुंबई सिटीने प्रत्येक सामन्यात सरासरी तीन गोल केलेत. अशी कामगिरी करताना त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीला चांगलीच चुरस दिली आहे. हैदराबाद आणि मुंबई सिटीमध्ये केवळ एका गुणाचा फरक हे स्पष्ट करतो. दोन्ही संघांनी कमालीचे सातत्य राखताना मागील तीन आठवड्यात पॉइंट्स टेबलमध्ये हा पाठशिवणीचा खेळ कायम राखला आहे. मात्र, फॉर्मात असलेल्या केरळा ब्लास्टर्स विरुद्ध तीन गुण मिळवताना त्यांचा कस लागेल.
मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी केरळा विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या संघातील बलस्थानांवर अधिक भर दिला. प्रतिस्पर्धी संघाने किती सलग तीन सामने जिंकलेत, याचा आम्ही फारसा विचार करत आहे. त्यामुळे आमच्या सध्याच्या कामगिरीकडे अधिक लक्ष देत नाही. आम्हाला आमच्या बलस्थानांवर फोकस करायचा आहे. आम्ही सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मागील चुका टाळण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या लेगमधील विजय आणि होमग्राउंडवर खेळण्याचा फायदा, अशा अनेक गोष्टी अनुकूल असल्या तरी आम्ही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही, असे बकिंगहॅम पुढे म्हणाले.
केरळा ब्लास्टर्ससाठी यंदाचा हंगाम कही खुशी कही गम असा ठरला आहे. विजयी सलामीनंतर त्यांच्यावर सलग तीन पराभवांची नामुष्की ओढवली. चार सामन्यांत त्यांना तीन गोल खावे लागले. त्यानंतर केरळा संघ तळाला फेकला गेला. मात्र, बचावफळीच्या उंचावलेल्या कामगिरीच्या जोरावर केरळाने दमदार पुनरागमन केले. बचाव उत्तम राहिल्याने पुढील आठ सामन्यांत केवळ पाच गोल खाल्ले.
केरळा ब्लास्टर्सच्या बचाव फळीची धुरा दिमित्रोस डियामांटाकोस, इव्हान कॅलुझ्नुइ आणि सहल समद यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. या त्रिकुटाने आजवर 13 गोल केलेत. मुंबई सिटीविरुद्धच्या मागील लढतीतही बचाव फळीने चांगला खेळ केला. पण नशीब यजमानांच्या बाजूने नव्हते.
एक प्रशिक्षक म्हणून चुरशीच्या सामन्याला माझी कायम पसंती आहे. खेळाडू होतो तेव्हाही मला असेच सामने आवडायचे. रंगतदार सामन्यांमुळे खेळाडू म्हणून तुमचा कस लागतो. तुम्ही तुल्यबळ संघाशी दोन हात करता तेव्हा तुमचे कौशल्य, कसब आणि स्टॅमिना पणाला लागतो, असे केरळा ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक इव्हान वुकोमॅनोविक यांनी सांगितले.
मुंबई सिटी एफसी आणि केरळा ब्लास्टर्स एफसी हे आयएसएलमध्ये आजवर 17 वेळा भिडलेत. त्यात सात विजयांसह मुंबई सिटीने आघाडी घेतली आहे. केरळाने चार वेळा बाजी मारली आहे. सहा सामने ड्रॉ झाले. मागील हंगामात ब्लास्टर्सनी तुफानी खेळ करताना मुंबई सिटीला दोन्ही सामन्यांत हरवले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या एकेरीचा नेदरलँडचा टॅलन ग्रीक्सपूर विजेता
ओडिशा एफसी पुन्हा विजयीपथावर, ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 अशी मात