---Advertisement---

केरला ब्लास्टर्सचा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न, अडखळणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान

---Advertisement---

गोवा: केरला ब्लास्टर्सची १० सामन्यांतील अपराजित मालिका मागील लढतीत बंगलोर एफसीनं खंडीत केली. त्यामुळे इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) पुन्हा विजयपथावर परतण्याचा केरला ब्लास्टर्सचा प्रयत्न आहे. शुक्रवारी त्यांच्यासमोर कामगिरीत सातत्य न राखू शकणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे आव्हान आहे. येथील टिळक मैदान स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

१२ जानेवारीनंतर केरला ब्लास्टर्सनं ३० जानेवारीला सामना खेळला. त्यांच्या काही लढती स्थगित कराव्या लागल्या होत्या. पण, या पुनरागमनाच्या सामन्यात केरला बास्टर्सना ०-१ अशा फरकानं बंगलोर एफसीकडून पराभव पत्करावा लागला होता. १० सामन्यांनंतर त्यांचा हा पहिलाच पराभव ठरला. मुख्य प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोव्हिच यांच्या मते तो एक झटकाच होता, अन्यथा संघाची वाटचाल दमदार सुरू होती. यंदाच्या पर्वात १० सामन्यांत अपराजित राहिलेला केरला हा एकमेव संघ आहे. त्यांनी या १० सामन्यांत पाच विजय मिळवले, तर पाच सामने अनिर्णित राखून २० गुणांची कमाई केली.

केरला ब्लास्टर्सच्या यशात सिंहाचा वाटा हा त्यांच्या बचावफळीचा आहे. त्यांनी १० पैकी पाच सामन्यांत प्रतिस्पर्धींना एकही गोल करू दिला नाही, तर आतापर्यंत केवळ ६ गोल खाल्ले आहेत. या १० सामन्यांत त्यांनी फक्त एकदाच एकपेक्षा अधिक गोल खाल्ले आहेत. ”आम्ही सातत्यानं मेहनत घेत आहोत. बऱ्याच दिवसानंतर आम्ही मागील लढतीत उतरलो होतो, परंतु आमच्या खेळाडूंनी मानसिक कणखरपणा दाखवला. त्यांची जिंकण्याची मानसिकता आहे आणि त्यामुळे आम्ही संघाच्या लोगोसाठी व फॅन्ससाठी लढाऊ बाणा दाखवणार, याची जाण चाहत्यांनाही आहे,”असे इव्हान म्हणाले.

दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेड गुणतालिकेत तळाला आहेत. एससी ईस्ट बंगालनं बुधवारच्या लढतीत चेन्नईयन एफसीला २-२ असे बरोबरीत रोखल्यानंतर युनायटेडची ११व्या स्थानी घसरण झाली. त्यात हैदराबाद एफसीनं त्यांना मागील सामन्यांत ५-० असे लोळवले. पण, मुख्य प्रशिक्षक खालिद जमिल यांनी आमचा संघ पुढील सामन्यासाठी तयार आहे, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,”उद्याच्या लढतीवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मागील सामन्यातील झालेल्या पराभवाचा आम्ही विचार करत नाही आहोत. हा एक सर्वोत्तम पर्याय आमच्यासमोर आहे. डेशॉर्न ब्राऊन बरा झाला आहे. त्यानं सरावातही सहभाग घेतला आणि उद्याच्या सामन्यात तो खेळणार आहे.”

ब्राऊन याला मागील चार सामन्यांत खेळता आले नाही आणि त्यामुळे नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आक्रमण कमकुवत जाणवले. ब्राऊन याने ११ गोल केले आहेत आणि या पर्वात सर्वाधिक १२ गोल करणाऱ्या बार्थो ऑग्बेचेची बरोबरी करण्याची त्याला संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार यशच्या शतकानंतर लक्ष्मणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अभिमान, रिऍक्शनचा व्हिडिओ व्हायरल

अंडर-१९ विश्वचषकात ‘या’ ५ खेळाडूंनी दाखवली आपल्या गोलंदाजीची ताकद, ठरले कौतुकास पात्र

मुलाच्या स्वप्नासाठी बापाने सोडली नोकरी, आता पोरानं भारतीय संघाला गाठून दिलीय फायनल; वाचा यश धूलबद्दल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---