---Advertisement---

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 5:40 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने विजय मिळवला असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी खुश आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कोहली नव्या वर्षाच्या सुरुवातीला चांगलाच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. केरळ हायकोर्टाने नुकतीच कोहलीला कायदेशीर नोटीस बजावली. कोहली ब्रँड अँबेसिडर असलेल्या एका ऑनलाईन रमी गेममुळे त्याला ही नोटीस दिली गेली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ब्रँड अँबेसिडर हे तरुणांना अश्या चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रोत्साहित करतात.

कोहलीला दिली गेली कायदेशीर नोटीस

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा एका ऑनलाइन रमी गेमची जाहिरात करतो. त्याच्यासोबत प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना व अभिनेता अजू वर्गीस हेदेखील याच रमी गेमला प्रसिद्धी देतात. केरळ हायकोर्टाने या तिघांनाही नोटीस बजावली आहे.

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “तिरुअनंतपुरमच्या विनीथ नामक तरुणाने या गेममध्ये २१ लाखाचे नुकसान झालेले आत्महत्या केली होती. साजेश नावाच्या व्यक्तीला देखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मी स्वतः देखील ६ लाख रुपये या गेम च्या व्यसनामुळे हरलो. इतरही लोकांना भरपूर नुकसान होतेय. माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप केल्याने मी त्यांचा आभारी आहे.”

ब्रँड अँबेसिडर बजावतात महत्त्वाची भूमिका

या याचिकाकर्त्याने पुढे म्हटले की, “ब्रँड ॲम्बेसिडर तरुणांना या असल्या गेमकडे आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या गेम्स लवकरच एक व्यसन बनून जातात. मला या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मनोवैज्ञानिकाची गरज भासली. माझी विनंती आहे की, भारतात या गेम्सना बंदी घालण्यात यावी.”

नुकताच पिता बनला आहे विराट

नव्या वर्षात प्रथमच पिता बनलेला विराट पुढील महिन्यापासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व करेल. पालकत्व रजा घेतल्याने विराट ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांत सहभाग घेऊ शकला नव्हता. तरीही, अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात युवा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली.

महत्वाच्या बातम्या:

फ्लॅशबॅक! २०१२ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर धोनी-गंभीर वाद आला होता चव्हाट्यावर

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : बडोद्याचा उपांत्यपूर्व फेरीत रोमांचक विजय, विष्णू सोळंकी ठरला नायक

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पंत धोनीच्या भेटीला, साक्षीने शेअर केले फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---