भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीदरम्यान सर्वत्र विराट कोहलीचीच चर्चा आहे. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज केरी ओ’कीफेनं विराट कोहलीची माफी मागितली. लाइव्ह मॅचदरम्यान या कांगारु खेळाडूनं कोहलीची माफी मागितली. या माफीमागील संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
झालं असं की, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टन्स यांच्यातील संघर्षानंतर केरी ओ’कीफनं थेट सामन्यादरम्यान एक टिप्पणी केली होती. तो म्हणाला की, विराट कोहलीनं अहंकारातून आपली कारकीर्द घडवली आहे. “कोहलीनं आपली संपूर्ण कारकीर्द अहंकारातून बनवली आहे. त्यानं एका नवोदित खेळाडूला पाहिलं आणि हे रिसेट करण्यास सुरुवात केली”, असं केरी ओ’कीफ सामन्यादरम्यान म्हणाला होता. यानंतर या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खूप टीकेला सामोरं जावं लागलं.
यानंतर केरी ओ’कीफ याला आपली चूक लक्षात आली. त्यानं स्टार स्पोर्ट्सवर माफी मागितली आणि म्हटलं की, “विराट कोहलीच्या वागण्याला उद्धट म्हटल्याबद्दल मला माफ करा. मी असं बोलायला नको होतं. त्याच्यात एक स्वॅग आहे आणि तो त्याच पद्धतीनं क्रिकेट खेळतो. मला वाटतं जेव्हा त्यानं दुसरा खेळाडू पाहिला, ज्याच्यात त्याचासारखा स्वॅग आहे, तेव्हा तो थोडासा चिडला आणि त्यानं त्याच प्रकारे उत्तर दिलं.”
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीची बॅट शांतच आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याला काही विशेष करता आलं नाही. त्यानं 4 चौकारांच्या मदतीनं 36 धावांची खेळी केली. तो पुन्हा एकदा चौथ्या स्टंपवरील चेंडू खेळताना आऊट झाला.
हेही वाचा –
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट! मुख्य निवडकर्ते मेलबर्नमध्ये दाखल
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं केल्या या 3 मोठ्या चुका
IND vs AUS; “आम्ही पुन्हा पुनरागमन करू” स्टार खेळाडूने व्यक्त केला विश्वास