पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आणि दुसर्या फेरीत झालेल्या सामन्यात डेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांनी बाजी मारली.
पहिला सामना डेक्कन 11 अ फुटबॉल संघ विरुद्ध व्हॅलीहंटर संघात सकाळी 9 वाजता झाला. या सामन्यात डेक्कन 11 अ संघाने आपले वर्चस्व दाखवून दिले. या सामन्यात डेक्कन 11 अ संघाचा ऋत्विक भारद्वाज या फुटबॉलपटूने शानदार कामगिरी करत 22 मीनिटाला, 26 मिनीटाला आणि 46 मिनीटाला असे तीन गोल करत संघाला आघाडीवर नेले.
ऋत्विक भारद्वाज हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे तसेच त्याने नुकत्याच झालेल्या खेलो इंडीया फुटबॉल स्पर्धेत शानदार कामगिरी साकारली होती. तर ऋत्विक भारद्वाजला साथ देत शेरॉन काकडे याने 42 मिनीटाला गोल करत डेक्कन 11 अ फुटबॉल संघाला विजयपथावर नेले. डेक्कन 11 अ फुटबॉल संघाचा राहुल कडलक याने सर्वोत्तम पास देत दिमाखदार खेळ केला. राहुल कडलक हा सुद्धा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे.
तर दुसरीकडे व्हॅलीहंटर फुटबॉल संघाच्या निखील गायकवाड याने सामन्याच्या 8 व्या मीनीटाला पेनल्टी किकवर सुरेख गोल केला होता. मात्र त्यानंतर व्हॅलीहंटर फुटबॉल संघाचे गुरमीत आणि बाकी खेळाडू अपयशी ठरल्याने हा सामना डेक्कन 11 अ फुटबॉल संघाने 4-1 असा जिंकला.
दुसर्या फेरीतील दुसर्या सामन्यात नवमहाराष्ट्र आणि परशुरामियन्स अ फुटबॉल संघ आमने सामने आले होते. हा सामना परशुरामियन्स अ फुटबॉल संघाने 3-0 असा एकतर्फी जिंकला. या सामन्यात परशुरामियन्स अ फुटबॉल संघाच्या सोहेल शेख याने सामन्याच्या पहिल्या 5 व्या मीनीटाला पहिला मैदानी गोल करत परशुरामियन्स अ फुटबॉल संघासाठी गोलांचे खाते उघडले.
तर त्यानंतर सोहेल शेख याने 35 मीनीटाला दुसरा मैदानी गोल केला. तर परशुरामियन्स अ फुटबॉल संघाच्या निखील नारायण याने 48 मीनीटाला मैदानी गोल करत परशुरामियन्स अ फुटबॉल संघाला 3 महत्वपुर्ण गोल मिळवून दिले. तर परशुरामियन्स अ फुटबॉल संघाचा गोलरक्षक रोहण फासगे हा राष्ट्रीय खेळाडू आहे, तसेच परशुरामियन्स अ फुटबॉल संघाचा रविराज कुरणे हा सर्वोत्तम पास देणारा फुटबॉलपटूही राष्ट्रीय खेळाडू आहे.
नवमहाराष्ट्र फुटबॉल संघाच्या फुटबॉलपटूंमध्ये शिवम शिंदे, दिलीप रॉय, यांना एकही गोल करता आला नाही तसेच नवमहाराष्ट्र संघाच्या शिवम शिंदे, दिलीप रॉय, यांना दांडगाईच्या खेळाबद्दल एलो कार्ड देण्यात आले.
तिसरा सामना मात्र चेतक अ संघ विरुद्ध एन,वाय,एफ ए संघात अत्यंत चुरशीचा झाला. हा सामना एन,वाय,एफ ए संघाने 6-5 असा जिंकला. एन,वाय,एफ ए संघाच्या धनंजय लडकत याने 36 मीनिटाला पहिला गोल केला. त्याला लगेचच चोख उत्तर देण्यासाठी चेतक अ संघाच्या यश सरदेसाई याने 42 मीनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. त्यामुळे हा सामना टायब्रेकरमध्ये गेला.
त्यानंतर एन,वाय,एफ ए संघाच्या कपील गुरव, मयुरेश खोपडे, धनंजय लडकत, शिवम पेडणेकर आणि हर्षे शहा या 5 खेळाडूंनी प्रत्येकी 1 गोल केला. तर चेतक अ संघाच्या यश सरदेसाई, रितेश ठुबे, निखील माळी, आणि सौरभ आहेर यांनी प्रत्येकी 1 असे 4 गोल केले. त्यामुळे एकूण 6-5 अशा गोल फरकाने हा सामना एन,वाय,एफ ए संघाने जिंकला.
चौथा सामनाही अत्यंत अटीतटीचा झाला. हा सामना संगम यंग बॉइज विरुद्ध फिनाय क्यु संघात रंगला हा सामना फिनाय क्यु संघाने 6-5 असा जिंकला. या सामन्यात फिनाय क्यु संघाच्या श्रीकांत मोलेनगीरी याने 44 मिनीटाला पहिला गोल केला. त्याला चोख उत्तर देताना संगम यंग बॉइज संघाच्या फिलीप डिसा याने 54 मिनीटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली.
त्यामुळे हा सामना टायब्रेकरमध्ये गेला. त्यानंतर फिनाय क्यु संघाच्या सुरज थापा, प्रकाश थोरात, श्रीकांत मोलेनगीरी, नेत्रा साही,ईश्वर क्षिरसागर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर दुसरीकडे संगम यंग बॉइज संघाच्या फिलीप डिसा, आशिष पांडे, हरिश शेख आणि नरसिंह यांनी प्रत्येकी 1 गोल केला. त्यामुळे टायब्रेकरमध्ये 5-4 असे गोल झाले. तर एकूण 6-5 अशा गोल फरकाने हा सामना फिनाय क्यु संघाने जिंकला.
या सामन्यात फिनायक्यु संघातील शानदार पास देणारा परेश शिवलकर हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. तर फिनाय क्यु संघाच्या जावेद शेखला एलो कार्ड देत समज दिली. अहन ऋतुला रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. संगम यंग बॉइज संघाच्या अविनाश सावंतलाही एलो कार्ड दिले.
केसरी करंडकाचा संक्षिप्त निकाल
दिवस पाचवा दुसरी फेरी
सामना 1) डेक्कन 11 अ फुटबॉल संघ विरुद्ध व्हॅलीहंटर संघ
निकाल : डेक्कन 11 अ फुटबॉल संघाने 4-1 असा जिंकला.
सामना 2) नवमहाराष्ट्र आणि परशुरामियन्स अ फुटबॉल संघ
निकाल : परशुरामियन्स अ फुटबॉल संघाने 3-0 असा एकतर्फी जिंकला.
सामना 3) चेतक अ संघ विरुद्ध एन,वाय,एफ ए संघ
निकाल : एन,वाय,एफ ए संघाने जिंकला.
सामना 4) संगम यंग बॉइज विरुद्ध फिनाय क्यु संघ
निकाल : फिनाय क्यु संघाने जिंकला.
आजच्या आयोजित सामन्यांचे वेळापत्रक
दुसरी फेरी –
1) डेक्कन 11 क फुटबॉल संघ विरुद्ध ब्लू स्टॅग : सकाळी 9 वाजता
2) इंद्रायणी विरुद्ध परशूरामियन्स ब संघ : सकाळी 10.30 वाजता
3) शिवाजीयन्स अ विरुद्ध पिफा फुटबॉल संघ : दुपारी 1:00 वाजता
4) स्निगमय एफसी विरुद्ध अशोका 11 संघ : दुपारी 2.30 वाजता