भारतीय क्रिकेट संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतला. भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अशी काही घटना घडली होती, ज्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक दक्षिण आफ्रिकी खेळाडू मैदानात फलंदाजी करायला उतरला किंवा गोलंदाजीला आला की ‘राम सिया राम’ हे गाण वाजवलं जात असे. हे पाहून भारतीय खेळाडूही अवाक झाल्याचे पहायला मिळाले. परंतू नंतर याबद्दल वेगळीच गोष्ट समोर आली.
मैदानात नेमकं काय घडलं आणि कोण होता तो खेळाडू?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या क्रिकेट सामन्यात एका पाेठोपाठ एक विकेट पडत होत्या. अशात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज हा मैदानावर येताना डीजेने ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवलं. यावेळी भारताचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहली या गाण्याला प्रतिसाद म्हणून आपले दोन्ही हात जोडून उभा राहिला. या प्रसंगाची पोस्ट स्वतः केशव महाराजने सोशल मीडियावर शेअर केली होती.
Jai shree Ram 🕉🙏🏻@imVkohli ❤ pic.twitter.com/RSUYHUi9Mf
— Keshav Maharaj (@imKeshavMaharaj) January 5, 2024
केशव महाराज आणि ‘राम सिया राम’
दक्षिण आफ्रिकेत केशव महाराज याच्या एंट्रीला हे गाण वाजण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापुर्वी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर सुद्धा हे गाणं केशव महाराज मैदानात फलंदाजी करायला आल्यावर वाजवलं होतं. आता या भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकी खेळाडूने आपण स्वतःच हे गाणं लावण्यासाठी सांगितलं होतं अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पत्रकाराने विचाललेल्या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला,
“मी स्वतःच हे गाणं लावण्याची विनंती केली होती. प्रभु श्रीरामांची माझ्यावर खूप मोठी कृपा राहिली आहे. त्यांनी मला आयुष्यात योग्य रस्ता दाखवला. त्यांच्यासाठी मी एवढं तर करुच शकतो. हे गाणं वाजवलं की मी माझ्या झोनमध्ये जातो. मैदानावर जाताना हे गाण बॅकग्राऊंडला छान वाटतं.”
दक्षिण आफ्रिकेचा हा फिरकी गोलंदाज भारतीय वंशाचा आहे. त्यामुळे त्याच्यावर झालेले भारतीय परंपरेचे संस्कार दिसून येतात. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या डरबन या शहरात झाला. या शहरात भारतीयांचं प्रमाण उल्लेखनीय आहे.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण