सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय वरिष्ठ खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आगामी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार असून रोहित आणि कंपनी यासाठीच ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. असे असले तरी, शिखर धवन याच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात वनडे मालिका खेळत आहे. आफ्रिकी संघाविरुद्ध खेळनारा भारतीय संघ हा दुय्यम दर्जाचा आहे, असे अनेकांना वाटते. परंतु आफ्रिकी संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याला मात्र असे वाटत नाही.
भारतीय संघात जागा पक्की करण्यासाठी असलेली स्पर्धा कुणापासूनच लपून राहिली नाहीये. भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या इतर देशांतील खेळाडूंपेक्षा अनेक पटींनी जास्त असू शकते. केशव महाराज (Keshav Maharaj) याला देखील ही गोष्ट चांगलीच माहीत असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर त्याने एक मोठे विधान केले आहे. त्याच्या मते भारतात गुणवंत खेळाडूंची कसलीही कमी नाहीये. तसेच एकाच वेळी पाच आंतरराष्ट्रीय संघ तयार होतील, एवढे खेळाडू त्यांच्याकडे आहेत, असेही त्याला वाटते.
आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे महत्वाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, असे युवा खेळाडू आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. केशव महाराजच्या मते वनडे मालिका खेळणारा संघात जरी युवा खेळाडू असले तरी, ते कडवे आव्हान देऊ शकतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला केशव महाराज म्हणाला की, “आमच्याविरुद्ध खेळत असलेला भारतीय संघ दुय्यम दर्जाचा नाही. भारतीय संघाकडे इतके खेळाडू आहेत की त्यांचे पाच आंतरराष्ट्रीय संघ बनू शकतात.”
दरम्यान, उभय संघातील मालिकेतील पहिला वनडे सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात पाहुण्या आफ्रिकेने यजमान भारतावर निसटता विजय मिळवला. पहिल्या सामन्यात 9 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर भारत सध्या या मालिकेत 0-1 अशा अंतराने मागे आहे. अशात आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत बरोबरी साधम्याच्या प्रयत्नात असेल. दुसरा वनडे सामना रांचीमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर; अनुभवी खेळाडूंसह ‘हे’ U19 विजेते संघात
न्यूझीलंडच टेन्शन वाढलं! दोन दिवसात दुसरा मॅचविनर दुखापतग्रस्त