टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज (29 जून, शनिवार) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे या दोन संघांमध्ये विजेतेपदाची लढत होईल.
या टी20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ फायनलमध्ये पोहचले आहेत. मात्र भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार असल्याचा अंदाज कोणी दीड महिना अगोदरच सांगितला तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकीपटू केशव महाराज यानं दीड महिन्यापूर्वी म्हणजेच आयपीएल 2024 दरम्यान, टी20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार असल्याचं भाकीत केलं होतं. केशव महाराज 2024 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. आयपीएल दरम्यान टी20 विश्वचषक फायनल कोणते दोन संघ खेळतील? असा प्रश्न विचारला असता महाराज म्हणाला होता, “दक्षिण आफ्रिका आणि भारत”. त्याचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
Maharaj predicted the #SAvIND final during IPL 🤯👏🏻 pic.twitter.com/18WIl7igBM
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 28, 2024
दक्षिण आफ्रिकेनं 1992 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. त्यानंतर 32 वर्षांनंतर संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचू शकला आहे. 2024 टी20 विश्वचषकापूर्वी आफ्रिकेनं अनेकवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र प्रत्येक वेळी ते त्या टप्प्यावर अपयशी ठरले. यावेळी मात्र संघानं हा अडथळा ओलांडून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
दुसरीकडे, टीम इंडियानं आतापर्यंत 12 वेळा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. ज्यापैकी भारतानं चार सामने जिंकले. टीम इंडियानं दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक, एकदा टी20 विश्वचषक आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कुठे पूजा…तर कुठे होम हवन! टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांचे देव पाण्यात
टी20 विश्वचषक विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव, उपविजेता संघही होणार मालामाल! बक्षिसाची रक्कम जाणून घ्या
शिवम दुबेचा पत्ता कट? टीम इंडिया बदलणार सलामी जोडी, पाहा फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग 11