ब्रिस्बेनमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (८ डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव १४७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर अनेक दिग्गजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान केविन पीटरसनने इंग्लंडच्या फलंदाजांचा बचाव केल्याचे पाहायला मिळाले आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. गाबाच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या १४७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर पाहुणा संघ पूर्णपणे दबावात आला होता.
इंग्लंड संघाचा संपूर्ण डाव १४७ धावांवर आटोपल्यानंतर केविन पीटरसनने ट्विट करत खेळाडूंचा बचाव केला आहे. त्याने लिहिले की, “१४७ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण डाव संपुष्टात आला. यासाठी कृपया खेळाडूंना दोष देऊ नका. आमची काऊंटी व्यवस्था खूपच खराब आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथून जागतिक दर्जाचे फलंदाज मिळणार नाहीत. वर्षानुवर्षे मी हेच सांगत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “फ्रँचायजी क्रिकेटमुळे काउंटी क्रिकेटचा स्तर खालावला आहे. युवा खेळाडूंना दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत नाहीये. हेच कारण आहे की, वरिष्ठ खेळाडूंचा कल फ्रँचायजी क्रिकेटकडे अधिक आहे. तिथे काम कमी आणि मानधन अधिक मिळते.”
https://twitter.com/KP24/status/1468535226532048899?t=DXltgMQBQHvj59_5OkLRGg&s=19
https://twitter.com/KP24/status/1468550516942774272?t=OI5f2Y9pvk4iL_lIAVQTsw&s=19
इंग्लंड संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. तर ऑली पोपने ३५ धावांचे योगदान दिले होते. तर कर्णधार जो रूटला भोपळा ही फोडता आला नव्हता.
महत्वाच्या बातम्या :
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार