सध्या रशिया आणि यूक्रेन (Russia-Ukraine War) शहरांमध्ये मोठे युद्ध सुरू आहे. रशियाने यूक्रेनवर हल्ले केल्यानंतर रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या दोन देशांमधील युद्धांमुळे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक केविन पीटरसन (Kevin Pietersen) याचे कुटुंब (Kevin Pietersen Family) बालंबाल वाचले आहे. पीटरसनने सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. त्याचे कुटुंबीय रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांवेळी यूक्रेनमध्ये होते. परंतु त्याची पत्नी आणि मुले कशीबशी यूक्रेनमधून बाहेर निघण्यात यशस्वी झाली आहेत. ते पोलँडमध्ये (Pietersen Family Escaped From Ukraine To Poland) सुखरूप पोहोचले आहेत.
पीटरसनने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. याबरोबरच त्याने पोलँड सरकारचे आभारही (Kevin Pietersen Thanked Poland)व्यक्त केले आहेत, ज्यांनी ४ लाख यूक्रेनियन नागरिकांना त्यांच्या देशात आश्रय दिला आहे.
पीटरसनने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘मी फक्त इतकेच म्हणू इच्छितोय की, यूक्रेनच्या लोकांसाठी पोलँड चांगली जागा आहे. माझे कुटुंबही यूक्रेनची सीमा पार करून पोलँडला गेले आहे. धन्यवाद पोलँड.’
https://twitter.com/KP24/status/1498268297053233152?s=20&t=ZdMDteuI6kPsQlnkLMZo3Q
पीटरसनबरोबर त्याची पत्नी जेसिका पीटरसन हिनेही पोलँड सरकारने आभार व्यक्त केले आहेत. तिने पीटरसनच्या ट्वीटवर लिहिले आहे की, ‘पोलँडच्या लोकांनो, तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्याप्रकारे स्वागत केले आणि आमच्याप्रती जी दया दाखवली, त्यासाठी आम्ही कधीही पूर्णपणे तुमचे आभार व्यक्त करू शकणार नाही. ‘
https://twitter.com/JessicaLibertyX/status/1498284623499038722?s=20&t=ZdMDteuI6kPsQlnkLMZo3Q
रशियाने २४ फेब्रुवारी रोजी यूक्रेनवर हल्ला केला होता. रशियाचे सैन्य यूक्रेनमध्ये घुसले आहे. त्यांच्या या निर्णयाचा पूर्ण जगभरातून विरोध होतो आहे. सद्यस्थितीला अमेरिकेसह अन्य मोठे यूरोपीय देश रशियाच्या विरोधात उभे आहेत.
केविन पीटरसनची क्रिकेट कारकिर्द
पीटरसनने २००५ ते २०१३ या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याने १३६ वनडे सामने खेळले असून ४४४० धावा केल्या आहेत. तसेच १०४ कसोटी सामन्यात ८१८१ धावा केल्या आहेत. याबरोबरच टी२० क्रिकेटमध्ये ३७ सामन्यात ११७६ धावांची नोंद केली आहे. तसेच पीटरसन हा जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण ३६ सामने खेळले असून १००१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना
संघ सहकाऱ्याच्या मदतीला धावला अझर; उचलणार किडनी शस्त्रक्रियेनंतरचा खर्च
सलग १२ विजयानंतरही माजी दिग्गज म्हणतोय भारतीय संघात ‘ही’ कमतरता