यूएई येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवांमुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याच्या मार्ग अवघड झाला आहे. भारताच्या या पराभवानंतर अनेक दिग्गज आपली प्रतिक्रिया देत आहेत. बरेच जण भारतीय संघावर ताशेरे ओढत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक केविन पीटरसन याने चक्क हिंदीमध्ये ट्विट करत भारतीय संघाचे मनोधैर्य वाढवले आहे.
पीटरसनने केले हिंदी ट्वीट
विश्वचषकातील सलग दुसऱ्या पराभवानंतर अनेक जण भारतीय संघावर टीका करत आहेत. भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुनील गावसकर यांच्यासह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने देखील भारतीय संघावर टीका केली. सर्वजण भारतीय संघाच्या विरोधात बोलत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक केविन पीटरसन याने भारतीय संघाचे मनोधैर्य वाढविले. त्याने हिंदीमध्ये ट्विट करत लिहिले,
‘खेळामध्ये एक विजेता असतो आणि एक पराभूत होतो. कोणताही खेळाडू हरण्यासाठी मैदानावर उतरत नाही. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. आपण लक्षात ठेवायला हवे की खेळाडू हे काही रोबोट नाहीत. त्यांना प्रत्येकवेळी पाठिंब्याची आवश्यकता असते.’
https://twitter.com/KP24/status/1455066555994230789?t=8xh_EJwsY7FgUJOzUmLztA&s=19
भारताचे सलग दोन पराभव
विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत सहभागीझालेल्या भारतीय संघाला स्पर्धेच्या सुरुवातीला सलग दोन पराभव स्वीकारावे लागेल. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतीय संघाला १० धावांनी लोळवत पहिला विश्वचषक विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुन्हा एकदा ८ गड्यांनी पराभूत झाला. भारतीय संघाला स्पर्धेतील आपले आव्हान टिकवायचे असल्यास उर्वरित तीन सामन्यात मोठे विजय साजरे करावे लागतील. तसेच इतर संघांच्या कामगिरीकडे देखील त्यांना लक्ष ठेवावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“केवळ विराट नाही, तर संपूर्ण संघ आणि सर्व प्रशिक्षकही अपयशी ठरलेत”
“विराट मानसिकदृष्ट्या कमकुवत”; भारतीय दिग्गजाची जहरी शब्दांत टीका
न्यूझीलंडविरुद्ध भारताने केल्या ‘या’ पाच चुका, ज्यामुळे संघाला करावा लागला पराभवाचा सामना