काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ घोषित केला गेला. आगामी वनडे विश्वचषकासाठीही हाच संघ निश्चित मानला जात आहे. याच संघात काही बदल करून इंग्लंड वनडे विश्वचषक खेळेल, असे सांगितले जात आहे. मात्र, या संघात हॅरी ब्रुक याला संधी मिळाली नाही. याविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आता इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार केविन पीटरनस देखील संघ व्यवस्थापाने ब्रुकला विश्वचषकासाठीच्या या संघातून बाहेर ठेवल्यामुळे हैरान आहे.
त्याचे झाले असे की, बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपली निवृत्ती मागे घेतली. मागच्या वर्षी वर्कलोडचे कारण देत त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाच्या आग्रहामुळे यावर्षी तो वनडे निवृत्ती मागे घेत आहे. स्टोक्सच्या पुनरागमनामुळे इंग्लंडला विश्वचषक 2023 मध्ये फायदा होऊ शकतो. मात्र, हॅरी ब्रुक (Harry Brook) याची कारकिर्दीतील पहिला विश्वचषक खेळण्याची संधी मात्र गेली. ब्रुक कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी महत्वाचा खेळाडू बनला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्याला आतापर्यंत फक्त तीन सामने खेळता आले आहेत. अशातच बेन स्टोक्समुळे या युवा खेळाडूची संधी हुकत असल्यामुळे केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने आश्चर्य व्यक्त केले.
पीटरसनच्या मते विश्वचषक संघात हॅरी ब्रुकची निवड झाली पाहिजे होती. सध्या सुरू असलेल्या द हंड्रेड लीगदरम्यान ब्रुक म्हणाला, “मी खूपच जास्त हैराण आहे की, हॅरी ब्रुक विश्वचषक संघात हॅरी ब्रुकला जागा बनवता आली नाहीये. तो खूप जबरदस्त खेळाडू आहे, त्यामुळे मला यावर विश्वास बसत नाहीये. मी त्याला दोन वर्षांपूर्वी हेडिंग्लेमध्ये खेळताना पाहिले होते. तेव्हा द हंड्रेड लीगची सुरुवात झाली होता. त्यावेली मी ब्रुकमध्ये एक सुपरस्टार पाहिला होता. मी एका खेळाडूला 360 डिग्री खेळताना पाहिले होते, जो एकाच चेंडूवर एक्स्ट्रा कवरच्या वरून आणि मिडविकेटवरून शॉट मारू शकत होता.” (Kevin Pietersen is surprised Harry Brook was not selected in England’s World Cup squad)
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ (आगामी वनडे विश्वचषकासाठी संघ) –
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
महत्वाच्या बातम्या –
ईशान किशन की केएल राहुल, विश्वचषकासाठी उत्तम पर्याय कोणता? यावर सौरव गांगुलीने दिले उत्तर