शनिवारी (१० ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा २५वा सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने चेन्नईला ३७ धावांनी पराभूत केले. दरम्यान चेन्नईचा फलंदाज अंबाती रायडूने संघाचा रन रेट ढासळत असताना फटकेबाजी न करता एक-दोन धावा घेत फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन रायडूच्या प्रदर्शनाला पाहून नाराज झाला.
पीटरसन म्हणाला की, “रायडूने थोडे सतर्क राहिले पाहिजे. आपण पाहिले आहे की जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू धाव घेताना खेळपट्टीच्या आत पळत असतात. तसेच ते अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही विरुद्ध संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ट दिले पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त धावा घेतल्या पाहिजेत.”
तसेच पुढे बोलताना पीटरसन म्हणाला की, “तुम्ही कोहली, डिविलियर्स, डू प्लेसिस, वॉर्नर, बेयरस्टो अशा फलंदाजांना पाहा. त्यांनी सगळ्यांनी स्वत:चा एक स्टँडर्ड तयार केला आहे. तुम्हालाही अशाप्रकारेच कामगिरी करावी लागणार आहे.”
चेनन्नईविरुद्धच्या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत १३२ धावाच करु शकला. त्यामुळे ३७ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान रायडूने चेन्नईकडून सर्वाधिक ४४ धावा केल्या. मात्र त्याने ४० चेंडूत ही धावसंख्या गाठली.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! आयपीएल २०२०मधील पहिल्याच सामन्यात स्टोक्सच्या नशिबी अपयश; ‘या’ गोलंदाजाने उडवली दांडी
“मीच आहे युनिव्हर्सल बॉस…”, हॉस्पिटलमध्ये चिल करत असलेल्या गेलने केले वक्तव्य
विक्रमवीर पांडे! हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकत मनीषने केला ‘खास’ विक्रम, वाचा सविस्तर
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा