जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आपले पहिले विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीसाठी खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद हा या हंगामात चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. याबाबत त्याने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
खलील याने भारतीय संघासाठी 2018 आशिया चषकात पदार्पण केले होते. मात्र, त्याला आपले संघातील स्थान फार काळ टिकवता आले नाही. मागील चार वर्षापासून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी आयपीएल हंगाम त्याच्यासाठी मोठी संधी असू शकतो. याच बाबतीत बोलताना त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्याशी संवाद साधताना, आपण सध्या उत्कृष्ट गोलंदाजी करत असल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“ज्यावेळी मी भारतीय संघाचा भाग होतो त्यापेक्षा आता 10 पट अधिक चांगली गोलंदाजी करत आहे. असे असताना देखील मी सध्या संघातून बाहेर आहे. मला वाटते की मी आता फलंदाजांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतोय.”
खलील याने मागील वर्षी दिल्लीसाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. एन्रिक नोर्कीए काही सामन्यासाठी उपलब्ध नसताना त्याने प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावलेली.
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ-
(Khaleel Ahmed Said Am 10 Time Better Bowler Now)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ
IPLपूर्वी हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्या, ‘सुपला शॉट’ म्हणताच घडलं ‘असं’ काही; विराटचीही खास कमेंट