भारतीय वेगवान गोलंदाज खलील अहमदनं (Khaleel Ahmed) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) आपल्या चमकदार कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं. या उत्कृष्ट कामगिरीमुळे, टी20 विश्वचषक 2024 साठी राखीव खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. तत्पूर्वी आता खलील अहमदनं महेंद्रसिंह धोनीसोबतच्या (Mahendra Singh Dhoni) नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
खलील अहमदनं (Khaleel Ahmed) 2018च्या आशिया चषकामध्ये हाँगकाँगविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानं न्यूझीलंडसह अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. तिकडे धोनीनं त्याला दिलेल्या फुलांचा फोटो व्हायरल झाला होता, ज्याने बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. ही घटना आठवताना खलीलने सांगितले की, तो क्षण त्याच्यासाठी किती खास होता आणि धोनीचा त्याच्या आयुष्यावर किती खोल परिणाम झाला.
आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना खलील अहमद म्हणाला, “माही भाईच्या न्यूझीलंडमधील चाहत्यांनी त्यांना फुले दिली आणि माही भाईने ती फुले मला दिली. काही चाहत्यांनी आमचा फोटो काढला, जो माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण होता. तो माझा मित्र किंवा मोठा भाऊ नाही, तो माझा गुरु आहे.”
पुढे बोलताना खलील अहमद म्हणाला की, “लहानपणापासूनच मला भारतासाठी पहिले षटक टाकण्याची इच्छा होती. मी झहीर खानला असे करताना पाहिले आणि त्याचे नेहमीच स्वप्न पाहत होतो. आशिया कपमध्ये माही भाईने मला पहिले षटक टाकण्यास सांगितले होते. मी तो क्षण जाऊ दिला नाही आणि इतक्या वेगाने धावलो की तो आपला विचार बदलू शकला नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहित काहीही विसरू शकतो, पण संघाच्या हिताची ‘ही’ गोष्ट विसरू शकत नाही!
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
रोहितच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल माजी खेळाडूचा मोठा खुलासा, म्हणाला…