भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातिल चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तीन दिवसाचा खेळ समाप्त झाला असून, सामना अनिर्णीत होण्याकडे झुकला आहे. मात्र, त्याचवेळी खलिस्तानी संघटनांनी या सामन्यात व्यत्यय आणण्याची धमकी दिल्यानंतर मैदानाबाहेर येईल तसेच दोन्ही संघांची सुरक्षा वाढवण्यात आली.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी खलिस्तानी संघटनांनी या सामन्यात व्यत्यय आणण्याची धमकी दिली आहे. भारताच्या सुरक्षा एजन्सीने याबाबतची कल्पना अहमदाबाद पोलिसांना दिली असून, त्यानुसार मैदानाबाहेरील तसेच खेळाडूंच्या हॉटेलवरील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
पंजाबपासून वेगळ्या खलिस्तानसाठी मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. खलिस्तानी नेते गरपरवंत सिंग पन्नू यांचा एक संदेश गुजरात मध्ये फिरत असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामध्ये खलिस्तान समर्थक अहमदाबाद कसोटीत येऊन खलिस्तानचा झेंडा फडकवणार असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळेच, सर्व स्तरावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या सामन्याचा विचार केला गेल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले होते. उस्मान ख्वाजाने 180 तर, कॅमेरून ग्रीन याने 114 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्य डावात 480 धावा उभ्या केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून युवा सलामीवीर शुबमन गिल याने 128 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 3 बाद 289 धावा केल्या आहेत.
(Khalistani Threatened To Ahmedabad Test India And Australia Teams Security Increase)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक