---Advertisement---

तिसरा दिवस टीम इंडियाचा! गिलच्या लाजवाब शतकानंतर टीम इंडिया 3 बाद 289

Virat Kohli Shubman Gill
---Advertisement---

अहमदाबाद कसोटीचा तिसरा दिवस भारतीय सलामीवीर शुबमन गिल याच्या नावावर राहिला. भारताने नाबाद 36 धावांपासून सामन्याच्या तिसऱ्या दिवसची सुरुवा केली आणि दिवसाचा शेवट होईपर्यंत तीन विकेट्सच्या नुकसानावर 289 धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा अपेक्षित खेळी करू शकला नाही, पण शुबमन गिलने स्वतःचे शतक पूर्ण केले.

संघाची दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या साधीने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी तिसऱ्या दिवशी शेवटच्या षटकांमध्ये भारतीय संघासाठी संयमी खेळ दाखवला. विराट कोहली 59 , तर जडेजा 16 धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा अजून 191 धावांनी मागे आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावांचा डोंगर उभा गेला. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने त्यांचा शेवटची विकेट गमावली आणि भारताला फलंदाजीची संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या साथीने शुबमन गिल (Shubman Gill) डावाची सुरुवात करण्यासाठी आला. रोहित आणि गिलने दुसऱ्या दिवसाचा शेवट नाबाद 36 धावांसह केला.

दुसऱ्या दिवशी रोहित आणि गिल पुन्हा खेळपट्टीवर आले. रोहितने 35 धावा करून विकेट गमावली. पण गिल मात्र 128 धावांची महत्वपूर्ण खेळी संघासाठी साकारू शकला. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजारा 42 धावा करून बाद झाला. पुजाराची विकेट गेल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीला आला. विराटने 5 चौकारांच्या मदतीने विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण 128 चेंडू खेळून 59 धावा केल्या.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला अजून एक विजय गरजेचा आहे. इंदोरमध्ये खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला मात दिली आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली. भारताला जर चौथ्या कसोटीत विजय मिळवता आला नाही, तर अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न कदाचित अपूर्ण राहू शकते. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील एक सामना श्रीलंकेने गमावला किंवा अनिर्णित राहिला, तर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम असतील.

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---