काल शुक्रवारी (17 जानेवारी) राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यात देशातील काही प्रमुख खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रविण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. या सर्व खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला. जे त्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतिबिंब आहे.
यावेळी राष्ट्रपतींनी 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्राप्तकर्त्यांमध्ये भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा समावेश आहे. ज्यांनी 1972 च्या पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल जलतरणात सुवर्ण पदक जिंकले होते.
गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये 22 वर्षीय मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरली. तर 18 वर्षीय डी गुकेश गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला हरवून सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनला. विश्वनाथन आनंदनंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय आहे.
दुसरीकडे, हरमनप्रीत सिंग टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचा भाग होता. दुसरीकडे, प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या 32 खेळाडूंपैकी 17 पॅरा-अॅथलीट आहेत.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे मानकरी
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
4. मनु भाकर (शूटिंग)
अर्जुन पुरस्कारचे मानकरी
1. ज्योती याराजी (अॅथलेटिक्स)
2. अन्नू राणी (अॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजीत सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा आर्चरी)
12. प्रीती पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलेटिक्स)
14. अजित सिंग पॅरा अॅथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
18. एच होकाटो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुळसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्या श्री सुमती शिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युडो)
26. मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा शूटिंग)
28. स्वप्नील कुसळे (शूटिंग)
29. सरबजोत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॅश)
31. साजन प्रकाश (स्विमिंग)
32. अमन सेहरावत (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (जीवनभर)
1. सुचा सिंग (अॅथलेटिक्स)
2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
3. संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव श्रेणी)
1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
यावेळी खेलरत्न आणि ध्यानचंद खेलरत्नमध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये कोणत्याही क्रिकेट खेळाडूचा समावेश नव्हता. जे आश्चर्यकारक होते. त्याच वेळी, क्रिकेटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रशिक्षकाच्या श्रेणीत समाविष्ट केले गेले नाही.
खेलरत्न पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्तिपत्र आणि 25 लाख रुपये रोख दिले जातात, तर अर्जुन पुरस्कारात 15 लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा आणि प्रशस्तिपत्र दिले जाते.
हेही वाचा-
Ranji trophy; मोठ्या मनाचा रिषभ, संघाच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय!
प्रतीक्षा संपली..! स्टार गोलंदाज टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार; शेअर केला खास व्हिडिओ
करुण नायरवर बीसीसीआय विश्वास दाखवणार? टीम इंडियाबाबत मोठी अपडेट समोर