पुणे । उत्तेजकाचे खेळातून मुळापासून उच्चाटन करणे गरजेचे आहे. खेळामध्ये जिंकून पदक मिळविण्याकरीता काही खेळाडू उत्तेजकाचे सेवन करतात. ते खेळाडू चुकीच्या मार्गाने जाण्याकरीता जबाबदार आहेतच, मात्र ज्यांना उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती मिळेल, त्यांनी देखील ती माहिती त्वरीत संबंधितांना देणे गरजेचे आहे. यातून उत्तेजक मुक्त खेळ ही संकल्पना रुजू होईल, असे सांगत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थांशी (नाडा) निगडीत तज्ज्ञांनी खेळाडूंशी संवाद साधला.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया स्पर्धेंतर्गत उत्तेजक चाचणीविषयी माहिती व जनजागृतीकरीता नेमबाजी संकुलात सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाडा चे डॉ.अंकुश गुप्ता, डॉ.चंद्रन, डॉ.जयप्रकाश सी, डॉ.भगतसिंग आदी उपस्थित होते.
डॉ.चंद्रन म्हणाले, उत्तेजक चाचणी, तपासणी, संशोधन आणि शिक्षण हे टप्पे अवलंबिण्यासोबतच उत्तेजक प्रतिबंधक नियमांप्रमाने काम करण्याचे उद््दीष्टय राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) समोर ठेवले आहे. त्याप्रमाने काम सुरु असून खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये सुमारे ३ हजार खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले असल्याचे नाडा शी निगडीत तज्ज्ञांनी सांगितले.
डॉ.अंकुश गुप्ता म्हणाले, खेलो इंडिया स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यापर्यंत उत्तेजक चाचणीविषयी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आजपर्यंत २५० खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात आली आहे. यापुढे आणखी १५० जणांची तपासणी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी