---Advertisement---

गुवाहाटी येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी असे असतील महाराष्ट्र कबड्डी संघ…

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 3:45 PM
---Advertisement---

गुवाहाटी-आसाम येथे केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत दिनांक ९ ते २२ जानेवारी दरम्यान तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.

तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेत एकूण २० खेळाचा सहभाग असून महाराष्ट्रातील खेळाडू १९ खेळांमधे सहभागी होणार आहेत. बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्राच्या खेळाडूंचे स्पर्धापूर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कबड्डी खेळामध्ये सहभागासाठी महाराष्ट्रातील २१ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुलाचे संघ पात्र ठरले आहेत. कबड्डीचे सराव शिबीर बालेवाडी पुणे येथे २९ डिसेंबर २०१९ पासून सुरू झाले आहे.

खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील (मुले) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रायगडचे संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर २१ वर्षाखालील (मुले) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नंदुरबारचे बजरंग परदेशी हे काम पाहणार आहेत. १७ वर्षाखालील (मुले) संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून औरंगाबादचे वाल्मिक निकम तर व्यवस्थापकपदी मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधीकारी सुवर्णा बारटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.२१ वर्षाखालील (मुले) संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सचिन शिंदे (पुणे) तर व्यवस्थापकपदी औरंगाबादचे जिल्हा क्रीडा अधीकारी अशोक गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असे असतील महाराष्ट्राचे कबड्डी संघ:

२१ वर्षाखालील:- पंकज मोहिते (मुंबई शहर), शुभम शिंदे (रत्नागिरी), सौरभ पाटील (कोल्हापूर), असलाम इनामदार (ठाणे), अजय पाटील (ठाणे), वैभव गर्जे (बीड), प्रदिप झीर्पे (पुणे), राजू कथोरे (ठाणे), संकेत लांडगे (पुणे), सिद्धेश पाटील (उस्मानाबाद), अभिजित चौधरी (पुणे), पवन पाथाडे (बुलढाणा)

१७ वर्षाखालील:- दिग्विजय जमदाडे (कोल्हापूर), आझाद केवट (मुंबई शहर), सिद्धांत पाटील (मुंबई शहर), संदेश देशमुख (बीड), शिवम पठारे (बीड), तेजस काळभोर (नाशिक), संकेत बिल्ले (कोल्हापूर), विश्वजीत पाटील (कोल्हापूर), कृष्णा शिंदे (कोल्हापूर), राहुल वाघमारे (पुणे), सूरज पवार (अकोला), रामेश्वर मांडले (परभणी)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---