केंद्र व राज्यशासनाच्या सयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे दि. ०९ ते २० जानेवारी, २०१९ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत कबड्डी खेळाचा ही समावेश आहे.
“खेलो इंडिया युथ गेम्स” मध्ये कबड्डीचे १७ वर्षाखालील व २१ वर्षाखालील असे दोन गट असून त्यात मुला-मुलीचे संघ असणार आहेत. स्पर्धेत एकूण १७ वर्षाखालील मुला-मुलींचे प्रत्येकी ८-८ संघ, तर २१ वर्षाखालील मुला-मुलींचे प्रत्येकी ८-८ संघ सहभागी होत आहेत.
यास्पर्धाचा कबड्डीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १७ वर्षाखालील मुला व मुलींचा महाराष्ट्र संघ ‘अ’ गटात आहेत. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्रासह दिल्ली, राज्यस्थान, उत्तरप्रदेश या संघाचा समावेश आहे. तर मुलींच्या १७ वर्षाखालील ‘अ’ गटात महाराष्ट्रासह हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार यांचा समावेश आहे.
२१ वर्षांखालील महाराष्ट्राचे दोन्ही संघ ‘ब’ गटात असून मुलांच्या विभागात महाराष्ट्रसह तामिळनाडू, पंजाब आणि केरळ आहे. तर मुलींच्या विभागात महाराष्ट्रसह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या संघाचा समावेश आहे.
सुरुवातीला साखळी सामने होतील, त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. १४ ते १६ जानेवारी दरम्यान सकाळ व सायंकाळ अश्या दोन सत्रात साखळी सामने खेळवण्यात येतील. १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येतील. १८ जानेवारीला चारही विभागाचे अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत.
“खेलो इंडिया युथ गेम्स” २०१९ पुणे, महाराष्ट्र –
१७ वर्षाखालील कबड्डी मुले:
‘अ गट’- दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र
‘ब गट’- हरियाणा, छत्तीसगड, तामिळनाडू, मध्यप्रदेश
१७ वर्षाखालील कबड्डी मुली:
‘अ गट’- हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र
‘ब गट’- छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल
२१ वर्षाखालील कबड्डी मुले:
‘अ गट’- उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड
‘ब गट’- महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ
२१ वर्षाखालील कबड्डी मुली:
‘अ गट’- हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, पंजाब
‘ब गट’- महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश