पुणे। घरच्या मैदानावर विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या महाराष्ट्राला २१ वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसला. उपांत्य फेरीतील पराभवामुळे त्यांना कास्यंपदकावरच समाधान मानावे लागले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. उत्कंठापूर्ण लढतीत त्यांना हिमाचल प्रदेश संघाने २२-१९ असे पराभूत केले. पूर्वार्धात हिमाचल प्रदेश संघाने १२-१० अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली.
हिमाचल प्रदेश संघाकडून पुष्पा हिने बोनस गुणांवर अधिकाधिक भर दिला. तसेच त्यांच्या खेळाडूंनी सांघिक कौशल्याचा प्रत्यय घडवित महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रभावी चढाया करण्यापासून वंचित ठेवले. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी व आसावरी खोचरे यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली.