Loading...

खेलो इंडिया युथ गेम्स: फुटबॉलमध्ये महाराष्ट्र-मेघालय बरोबरी

गुवाहटी। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात फुटबॉलमध्ये मुलांच्या २१ वर्षांखालील गटात पूर्वार्धात आठव्या मिनीटालाच मिळविलेल्या आघाडीचा फायदा महाराष्ट्राला उठवता आला नाही. उत्तरार्धात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या दुस-या पेनल्टी किकवर मेघालयाने १-१ ने बरोबरी साधली.

Loading...

महाराष्ट्राने वेगवान सुरवात करताना आठव्याच मिनीटाला गोल केला. या वेळी बचावपटूचा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न फसला आणि अमन गायकवाडने क्षणाचाही विलंब न लावता चेंडूला जाळीची दिशा दिली. त्यानंतर महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात मेघालयाला कठिण गेले. पण, बचावाच्या प्रयत्नांत झालेल्या चुकीचा फटका महाराष्ट्राला बसला. ठराविक अंतराने मेघालयाला दोन पेनल्टी किक मिळाल्या. पहिली अपयशी ठरल्यावर दुस-या किकवर बनमन रॉयने मेघालयाला बरोबरी साधून दिली. बाद फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राला आक्रमकांकडून गोल करण्याच्या दवडलेल्या संधीची खंत नक्कीच वाटत असेल.

मुलींच्या हॉकीत उत्तरप्रदेशचा महाराष्ट्रावर सफाईदार विजय

सांघिक कौशल्याचा अभाव दाखवित खेळणाºया महाराष्ट्राला मुलींच्या १७ वर्षाखालील गटात उत्तरप्रदेशकडून ०-४ असा दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. पूर्वार्धात उत्तरप्रदेशने १-० अशी आघाडी घेतली होती.

उत्तरप्रदेशकडून शशिकला हिने १२ व्या व ५५ व्या मिनिटाला गोल करीत महत्त्वाचा वाटा उचलला. रुचिका उपाध्याय हिने ४० व्या मिनिटाला तर श्रेया श्रीवास्तवने ५१ व्या मिनिटाला गोल करीत तिला चांगली साथ दिली. उत्तरप्रदेशच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविले तसेच त्यांच्या आक्रमणात प्रभावही होता. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अचूकतेचा अभाव दाखविला. त्यामुळेच त्यांना पेनल्टी कॉर्नरसह गोल करण्याच्या किमान चार पाच संधींचा लाभ घेता आला नाही. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा दुरावल्या आहेत.

Loading...
Loading...
You might also like
Loading...