खो खो विश्वचषक 2025: खो खो विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने नेपाळचा 54-36 असा पराभव केला. या विजयासह भारताने पहिल्यांदाच खो खो वर्ल्ड कपवर नाव नोंदवला आहे. महिला संघानंतर, पुरुष संघानेही सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी दाखवली. लीग स्टेजपासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यात, महिलांनंतर, पुरुषांनीही नेपाळला लोळवले. संघाने अभिमानाने भारतीय ध्वज फडकवला. महिलांनंतर आता प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघानेही या सामन्यात इतिहास रचला आहे.
भारतीय पुरुष संघ आणि नेपाळ संघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याच्या स्कोअरकार्डवर एक नजर टाकली तर, सुरुवातीपासूनच टीम इंडियाच्या आक्रमकांनी नेपाळच्या बचावपटूंविरुद्ध चमकदार कामगिरी केली. नेपाळ संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बचाव करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याची चाल त्यांनाच अंगलट आली. पहिल्याच डावात टीम इंडियाच्या उडत्या आक्रमकांनी नेपाळच्या बचावपटूंना स्थिरावण्याची संधी न देता 26 गुण मिळवले. भारतीय संघाने नेपाळच्या 4 बॅच बाद केल्या. नेपाळला एकही गुण मिळाला नाही.
दुसऱ्या डावात बचाव करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंनी नेपाळच्या आक्रमकांना चांगलीच टक्कर दिली. मात्र, बचाव करताना त्याला एकही गुण मिळाला नाही. दुसऱ्या टर्नमध्ये बचावफळीतून भारताला एकही गुण मिळाला नाही. दरम्यान, नेपाळच्या आक्रमकांनी 18 गुण मिळवले. तिसऱ्या डावात आक्रमण करताना, भारतीय संघाने पुन्हा एकदा चमत्कार केला. 28 गुण मिळवत नेपाळला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. या डावातही नेपाळला बचावात एकही गुण मिळवला नाही. चाैथा डावही भारतीय खेळाडूंंच्या नावे राहिला. शेवटी टीम इंडियाने सामना 54-36 च्या फरकाने जिंकला.
This is what winning the #KhoKhoWorldCup feels like 😍🏆
Congratulations, #TeamIndia! What an epic victory! 👏🔥#TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCMen #KKWC2025 pic.twitter.com/KPTOx1sN1h
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
अंतिम सामन्यातही टीम इंडियाने तेच केले जे ते पहिल्या सामन्यापासून करत होते. संपूर्ण सामन्यात नेपाळला पुनरागमन करण्याची एकही संधी देण्यात आली नाही. ज्यामुळे संघाला जागतिक विजेतेपद पटकावण्यात यश आले. भारतीय खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. भारताने सलग 7 सामने जिंकून खो खो विश्वचषक 2025 चा ट्रॉफी आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा-
VIDEO; वानखेडेच्या 50व्या वर्धापनदिनामध्ये रोहित शर्माने जिंकली चाहत्यांची मनं..!
भारताचा ‘गोल्डन बाॅय’ अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर खास क्षणांची झलक
Champions Trophy; सूर्यकुमार यादवची भारताला उणीव भासणार, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया