बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे असते. अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर राहिला. सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने जबरदस्त प्रदर्शन करत शतक पूर्ण केले. याच पार्श्वभूमीवर ख्वाजावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही ख्वाजाच्या कौतुकात खास प्रतिक्रिया दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील हा चौथा कसोटी सामना गुरुवारी (9 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या आहेत. सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी नाबाद 104 धावा केल्या. अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी ख्वाजाचा खेळ पाहून माजी भारतीय दिग्गज वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्याचे कौतुक केले. माध्यमांसमोर जाफर म्हणाला, “उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला. त्याने आपला क्लास दाखवला आणि अप्रतिम फलंदाजी केली. तसेच आपल्या शतकासाठी दिवसभर खेळला.”
जाफरने दाखवून दिली भारतीय गोलंदाजांची चूक
वसीम जाफरच्या मते भारतीय गोलंदाज उस्मान ख्वाजाच्या वोरिधात अधिक चांगले प्रदर्शन करू शकत होते. खासकरून वेगवान गोलंदाजांनी ओवर द विकेट गोलंदाजी केली पाहिजे होती, असे जाफरला वाटते. भारतीय गोलंदाजांच्या चुका दाखवून देताना जाफर म्हणाला, “ख्वाजाचा फुटवर्क खरोखर चांगला होता. मी समजू शकतो अश्विन राउंड द स्टंप्स गोलंदाजी करत आहे कारण यामुळे एलबीडब्ल्यू आणि बोल्ड होण्याची शक्यता असते. पण वेगवान गोलंदाजांनी ओवर द विकेट गोलंदाजी केली पाहिजे होती. ख्वाजाने अनेकदा वेगवान गोलंदाजाना निक करताना बाद झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने संपूर्ण दिवस गोलंदाजी करण्यापेक्षा तुम्ही चांगले प्रदर्शन करू शकत होता.”
(‘Khwaja has put in a tremendous performance in the series…’, a big statement from the Indian legend)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण
‘भारतीय संघ याठिकाणी कमी पडला…’, अहमदाबाद कसोटीदरम्यान गावसकरांचे मोठे वक्तव्य