Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागच्या 10 वर्षीत एकट्या ख्वाजाने भारतात केली ‘अशी’ कामगिरी, केली श्रीलंकन दिग्गजाची बरोबरी

मागच्या 10 वर्षीत एकट्या ख्वाजाने भारतात केली 'अशी' कामगिरी, केली श्रीलंकन दिग्गजाची बरोबरी

March 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Usman Khawaja

Photo Courtesy: bcci.tv


ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा अहमदाबाद कसोटीत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. गुरुवारी (9 मार्च) सुरू झालेल्या या सामन्यात उस्मान ख्वाजाने डावाची सुरुवात केली आणि दिवसाचा शेवट होताना नाबाद 104 धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. उस्मान ख्वाजा भारतात भारताविरुद्धच्या कसोटीत अशी कामगिरी करणारा 2013 नंतर केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे.

भारतीय संघाविरुद्ध भारतात कसोटी सामना खेळताना कोणत्याही फलंदाजासाठी दिवसभर फलंदाजी करणे सोपी गोष्ट नाहीये. 2013 साली श्रीलंकन संघाचा दिग्गज दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) याने भारताविरुद्धच्या कसोटीत संपूर्ण दिवस फलंदाजी केली होती. उभय संघांतील हा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळला गेला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चंदीमलने भारतीय गोलंदाजांचा घाम काढला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. त्याने नाबाद 25 धावांपासून खेळायला सुरुवात केली आणि 147 धावा करून तिसऱ्या दिवशी नाबाद राहिला होता. चंदीमलच्या या खेळीनंतर मागच्या 10 वर्षांमध्ये एकही विदेशी खेळाडू भारतात कसोटी खेळताना संपूर्ण दिवस फलंदाजी करू शकला नव्हता. गुरुवारी उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) अखेर अशी कामगिरी करणारा इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला.

दरम्यान, या अहमदाबाद कसोटीचा एकंदरीच विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार स्टीव स्मिथचा हा निर्णय ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी योग्य ठरवण्यासाठी समाधानकारक फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. सलामीवीर ट्रेविस हेड 32, तिसऱ्या क्रमांकावरील मार्तन साबुशेन 3, चौथ्या क्रमांकावरील कर्णधार स्टीव स्मिथ 38, तर चौथ्या क्रमांकावर पीटर हॅड्सकॉम्ब याने 17 धावा करून विकेट्स गमावल्या. सलामीवीरा आलेला उस्मान ख्वाजा मात्र दिवसाचा खेळ संपेपपर्यंत बाद झाला नाही. ख्वाजाने 251 चेंडूत 104 धावा केल्या. कॅमरून ग्रीन ख्वाजाच्या साथीने 49 धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता.

भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या दिवशी दोन विकेट्स गेऊ शकला. तर दुसरीके रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीपटूंना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (After Dinesh Chandimal, Usman Khawaja has become the second player to achieve this feat in the last 10 years)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार


Next Post
Photo Courtesy: Twitter

भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अभिनेते सतिश कौशिक यांना श्रद्धांजली, ट्विट करत जागवल्या आठवणी

Sunrisers-Hyderabad

आयपीएल 2023 ची सुरुवातच होणार नीरस! 'या' देशाचे खेळाडू करणार लेट एंट्री

Sri-Lanka-Cricket

न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका पराभूत होणार? WTC फायनलविषयी दिग्गजाची भविष्यवाणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143