---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अभिनेते सतिश कौशिक यांना श्रद्धांजली, ट्विट करत जागवल्या आठवणी

On: गुरूवार, मार्च 9, 2023 9:02 PM
---Advertisement---

प्रसिद्ध विनोदी अभिनेते सतीश कौशिक यांचे गुरूवारी (9 मार्च) आकस्मित निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्याचवेळी भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंनी देखील ट्विट करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

भारतीय चित्रपट सृष्टीतील वरिष्ठ अभिनेते म्हणून सतीश कौशिक यांच्याकडे पाहिले जात होते. चरित्र अभिनेता तसेच एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी विशेष ओळख कमावली होती. त्यांचे चाहते सर्वसामान्यांपासून मोठे सेलिब्रिटी देखील होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने ट्विट करत लिहिले,

 

‘आजची सकाळी एका वाईट बातमीने उगवली. दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. चित्रपटसृष्टीची भरून न येणारी हानी यामुळे झाली आहे. त्यांचे कुटुंब तसेच मित्र परिवाराच्या सोबत आम्ही आहोत.’

 

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने ट्विट करत लिहिले,

‘अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. केवळ अभिनेतेच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून देखील ते सर्वोत्तम होते. ज्यावेळी त्यांना भेटत होतो तेव्हा छान वाटायचे. तुम्हाला नक्कीच मिस करेन.’

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच, लेखक व चित्रपट दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

(Yuvraj Singh And Suresh Raina Tweet For Sending Condolences To Legendry Actor Satish Kaushik)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---